श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात :

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात करण्यात आली. सदर प्रसंगी राष्ट्रध्वजांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला प्राचार्य डॉ आर बी बारजिभे, प्रकल्प समन्वयक प्रा. ए. व्ही. पाटिल, डॉ.गिरीश कुलकर्णी, डॉ.एस. बी. ओझा, डॉ.पंकज भंगाळे, डॉ. डि. डि. पाटिल, डॉ. अजित चौधरी, डॉ.जी.सी. जाधव,प्रा.जे.एस.चौधरी,डॉ.जे.आर. चौधरी,प्रा.जी.पी.भोळे,प्रा.आय.डी.पॉल, प्रा.सिद्धार्थ केदारे,एन. बी.पाटील तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व भावी अभियंत्यांची उपस्थिती होती.
ह्या प्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ आर बी बारजिभे यांनी राष्ट्राप्रती समर्पणाची भावना सतत जागृत ठेवण्याचे आवाहन करतांना भावी अभियंत्यांसामोर राष्ट्रउभारणीचे मोठे आव्हान असल्याचे सांगितले. आपापल्या ज्ञान शाखांमधील तंत्रज्ञानाचा वापर करत भारताला तंत्रज्ञानाच्या सर्वोच्च आणि स्वावलंबी पातळीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नरत राहण्याविषयी त्यांनी भावी अभियंत्यांना मार्गदर्शन केले.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड यांनी शुभेच्छा दिल्या.