संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरी ;

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन म्हणजे शियाली रामामृतन रंगनाथन यांची जयंती १२ ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली.

ह्या प्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ आर बी बारजिभे यांनी सुसंस्कृत आणि बलशाली देश व समाजनिर्मितीसाठी व्यावसायिक शिक्षणच नव्हे तर निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याचे महत्त्व डॉ. रंगनाथन यांनी सर्वप्रथम पटवून दिल्याचे सांगितले.

देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी व वैज्ञानिक विचारबांधणी निर्माण होण्यासाठी ग्रंथालयांचा विकास आणि प्रसार करून वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे हा विचार डॉ. रंगनाथन यांनीच सर्वप्रथम देशात रुजवला व राष्ट्रसंत श्री.गाडगेबाबांना अभिप्रेत समजनिर्मितीमध्ये ग्रंथालय , ग्रंथपाल आणि ग्रंथसेवकांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला प्राचार्य डॉ आर बी बारजिभे, ग्रंथालय समिति प्रमुख डॉ. अजित चौधरी, ग्रंथपाल श्री. पी. एस. भट, डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा. ए. व्ही. पाटील, डॉ.एस. बी. ओझा, प्रा. डि. जी. अग्रवाल, प्रा. पी. एम. अत्तरदे, डॉ. नीता नेमाडे, डॉ.जे. आर. चौधरी, प्रा. जी. पी. टेंभुर्णीकर, प्रा. नितीन खंडारे, प्रा. अनिकेत पाठक, प्रा. सुजय राजपुत, प्रा. पी. जे. वानखेडे यांची उपस्थिती होती.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड यांनी शुभेच्छा दिल्या.