भुसावळात समस्त ब्राह्मण समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने 10 वी 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न :

भुसावळ – जळगाव जिल्हा ब्राह्मण महासंघ व ब्राह्मण युवा आघाडी शाखा ,श्री परशुराम जन्मोत्सव समिति व समस्त ब्राह्मण समाज भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकताच दिनांक १७ जुलै रविवार रोजी भुसावळ येथील जुने राम मंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला.
यावेळी दहावी व बारावीचे मिळून जवळपास 33 गुणवंत विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते .
प्रसंगी जळगाव येथील पंकज व्यवहारे व त्यांचे सहकारी मकरंद डबीर सर यांनी करिअर कौन्सिलिंग या विषयावर गुणवंतांना मार्गदर्शन केले. तसेच जळगाव येथील ब्रह्मदंड या मासिकाचे संपादक अजय डोळे व ब्राह्मण महासंघाच्या वतीने सौ हेमलता ताई कुलकर्णी या कार्यक्रमास उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमात आनंदी महिला आघाडी शाखा भुसावळ नूतन कार्यकारणीची देखील घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा ब्राह्मण महासंघाचे तालुका प्रतिनिधी दीपक पाथरकर गुरुजी व ब्राह्मण युवा आघाडी शाखा भुसावळचे अध्यक्ष देवेश कुलकर्णी व शिव भोजन थाळीचे संचालक नमा(उमाकांत) शर्मा ,तसेच महिला आघाडी व समस्त ब्राह्मण समाजाचे अनमोल सहकार्य लाभले.
या प्रसंगी सूत्र संचालन युवा आघाडीचे भूषण वैद्य यांनी केले अनिरूद्ध कुलकर्णी, सागर पतकी,देवेश कुलकर्णी, संकेत कुलकर्णी, प्रशांत उपासनी, गौरव हिंगवे, जयप्रकाश शुक्ला,आशिष तिवारी, भूषण जोशी, केरालकर गुरुजी, आदि समाज बांधव उपस्थित होते.