महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे समाजोपयोगी स्तुत्य उपक्रम… घरात अडगळीत पडलेल्या वस्तू गोळा करून गरजू व गरीबांच्या उपयोगी आणण्यासाठी महिलांचा पुढाकार ;


भुसावळ – समाजातील काही गरजू वृध्द लोकांना काठी, वाँकर, खुर्ची, व्हील चेअर, वाँटर बेड. अजून काही गोष्टींची आवश्यकता असते, आपण या गोष्टी विकत घेतो सुध्दा पण व्यक्ती गेल्यावर काही दिवसांनी या गोष्टी अशाच घरात पडून राहतात व अडगळीत जातात. अशा गोष्टी गोळा करून जेष्ठ नागरिक संघाशी संपर्क साधून त्यांच्या जवळ देवू म्हणजे गरजू लोकांपर्यंत या वस्तू पोहोचतील. खरच अशा वस्तुंची समाजातील अनेक गरजु व गरीब नागरिकांना आवश्यकता आहे ही बाब महिला क्रिडा मंडळ भुसावळ अध्यक्षा आरती चौधरीं व सचिव लता होसकोटे यांचेसह सदस्यांचे लक्षात आली म्हणून पुढाकार घेवून माणूसकीचे पाऊल महिलांनी उचलले . या उपक्रमाची जबाबदारी सौ. प्राची राणे व सौ. वैशाली भगत यांनी स्विकारली आहे .
गेल्या आठवडय़ात एका वृध्द व्यक्तीसाठी फाउलर बेडची आवश्यकता असल्याचे समजले. त्यासंदर्भात महिती घेऊन महिन्याचे भाडे देऊन बेड उपलब्ध आहे असे समजले. त्या प्रमाणे तो बेड उपलब्ध झाला.दरम्यान यावेळी लक्षात आले की अशा वस्तू.. ब-याच वेळा आपल्या पण घरात अडगळीत पडलेल्या असतात मग आपणच आपल्या मेंबर्स कडून गोळा करून त्यावस्तु जेष्ठ नागरिक संघाच्या ताब्यात देऊ. नंतर पुढे ते योग्य व गरजुना डिस्ट्रीब्यूट करणार .