संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्व, उपयोजन आणि नोंदणी ह्या विषयी मार्गदर्शन :

भुसावळ – येथील श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्व, उपयोजन आणि नोंदणी ह्या विषयीच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून नामांकित नोंदणीकृत बौद्धिक संपदा व व्यापारी मुद्रा तज्ञ श्री. अमोल रवींद्र पाटील हे पेटंट ऑफिस मुंबई येथून दूरस्थ दूरसंचार माध्यमाद्वारे उपस्थित होते.
कार्यक्रम दरम्यान प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांनी तसेच बौद्धिक संपदा अधिकार तसेच व्यापारी मुद्रा यांची नोंदणी, त्यामागची कायदेशीर प्रक्रिया, शुल्क आणि फायदे या विषयीची माहिती असणे आज काळाची गरज असल्याचे सांगितले. अभ्यास, संशोधन आणि त्या बरोबरीनेच पेटेंटिंग अर्थात बौद्धिक संपदा अधिकारांची नोंदणी ह्या पायर्यांाचा वापर करत व्यावसायिक पद्धतीने अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.
श्री. अमोल रवींद्र पाटील यांनी जमीन-जुमला, मालकीचे घर, सोने-नाणे, बँकेतील बचत रक्कम, भली मोठी गाडी ही सारी दृश्य भौतिकसंपत्ती आहे. याशिवाय आणखीही एक वेगळी संपत्ती आहे, पण ती न दिसणारी अशी आहे. ती म्हणजे बौद्धिक संपत्ती आणि हा अमूर्त मालमत्तेचा एक प्रकार असल्याचे सांगितले. बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्व वेळीच लक्षात घेऊन एखदा उत्पादक किंवा संकल्पक आपल्या नाविन्यपूर्ण उत्पादना पासून किंवा संकल्पनेपासून संपत्ति निर्माणाच्या दिशेने वाटचाल सुरू करू शकतो असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच आभारप्रदर्शन प्रा.अनिकेत पाठक यांनी केले. सदर मार्गदर्शन वर्गात शंभरहून अधिक संशोधक, प्राध्यापक तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमानंतर प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड यांनी ह्या उपक्रमाचे कोतूक केले.