भुसावळात पालिकेतर्फे ९ रोजी दिव्यांग बांधवासाठी आरोग्य तपासणी शिबिर :


भुसावळ – भुसावळ नगर पालिका आणि इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत गाडगे महाराज नगर परिषद दवाखाना येथे दि. 9 जुलै 2022 रोजी , सकाळी 11 वाजता दिव्यांग व्यक्तिकरिता आरोग्य तपासणी
शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरास खासदार रक्षाताई खडसे , माजी महसूल मंत्री
महाराष्ट्र राज्य एकनाथराव खडसे , आमदार संजय सावकारे तसेच उपविभागीय अधिकारी रामसिंग
सुलाने यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे .
या आरोग्य विषयक शिबिरात भुसावळ शहरातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. आशिष रत्नानी , डॉ. निलेश महाजन , डॉ. किरण झांबरे, डॉ. चितरंजन चौधरी यांच्या द्वारे तपासणी करण्यात येणार असून मार्गदर्शन करण्यात येईल.
यामध्ये आवश्यक आणि योग्य व्यक्तीला जयपूर फुट आणि
हँड बसविण्यासाठी नोंदणी, तपासणी करण्यात येणार आहे. सदरचे शिबिरात दिव्याग व्यक्तिचे आवश्यकतेनुसार
रक्त लघवी तपासणी, औषधी वाटप करण्यात येणार आहे.
तसेच मोफत जयपूर फुट आणि हॅड देण्यात येणार आहे याकरिता शिबिरात अपंगत्वाचा दाखला, आधारकार्ड या आवश्यक
कागद पत्रासाहित उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याधिकारी नगर परिषद संदीप चिद्रवार यांनी
केले आहे. तसेच नगर पालिका भुसावळ यांच्या मार्फत दिव्यांग व्यक्तिला त्याचे दिव्यागत्वाचे प्रमाणानुसार
शासन निर्देशानुसार निधी वाटपाचे नियोजन या शिबिरात केले आहे. तसेच या शिबिरातून निवड केलेल्या दिव्याग व्यक्ती ज्यांना जयपूर फुट आणि Prosthetic Hand
बसविणे आवश्यक आहे. ज्यांची निवड झालेले व्यक्तिवर पुढील सर्व उपचार हे न. पा. भुसावळ आणि इनरव्हील
क्लब ऑफ भुसावळ यांच्या माध्यमातून मोफत करण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्याधिकारी संदीप चिद्रवार
भुसावळ यांनी दिली आहे .
शिबिराच्या अधिक माहितीसाठी
भुसावळ. न. प. संचलित मुख्य दवाखाना , वरणगाव रोड नागरी प्राथमिक केंद्, खडका रोड नागरी प्राथमिक केंद्र , बद्री प्लॉट नागरी प्राथमिक केंद्र, महात्मा फुले नागरी प्राथमिक केंद्र
येथे दिव्याग नागरिकांनी भेट देवून माहिती घ्यावी तरी दिव्याग नागरिकांनी याचा लाभ
घ्यावा,असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे .