भुसावळ – हिंदू धर्माच्या ग्रंथ व पुराणानुसार जेवढे महत्व गंगा, नर्मदा नद्यांना आहे तेवढेच तापी नदीचे महत्व सांगण्यात आले आहे. खान्देशातील शेतीच नाही तर समाज जीवन समृद्ध करणाऱ्या जीवनदायी तापी नदीचे भुसावळ शहराला लाभलेला वरदानाला लक्षात घेता तापी उत्थान एवं उत्सव सेवा समिती, सप्तशृंगी माता बहुउद्देशीय संस्था, सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था व नॅशनल युथ क्लब आदी संस्थांनी पुढाकर घेत आज ६ जुलै रोजी आषाढ शुद्ध सप्तमी तापी नदीचा दुपारी १ वाजता इंजीन घाटाजवळ विधीवत पूजा करून जन्मोत्सव साजर करण्यात आला. या निमित्ताने उपस्थितांना सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फ़े वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले.
शहरातील तापी उत्थान एवं उत्सव सेवा समितीसह विविध संस्थांनी पुढाकार घेत दुपारी १ वा तापी नदी पात्रात जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जयप्रकाश शुक्ला, सुरेश शर्मायांनी तापीनदी पूजनाला प्रारंभ केला. यावेळी पुजेचे मुख्य यजमान प्रशांत रामदास वैष्णव सपत्नीक बसले होते. त्यांच्यासमवेत डॉ. विजय सोनी, रवीओम शर्मा, नमा शर्मा, गोविंद अग्रवाल आदी सहभाग नोंदविला. पूजेनंतर महाआरती करण्यात आली. नदीची ओटी भरून महावस्त्र साडी-चोळीचे नदीस अर्पण करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष प्रशांत वैष्णव, मेघा वैष्णव, अजय पाटील, भारती वैष्णव, रितीका चौरसिया, दिनेश महाजन उपस्थित होते. अल्पोहराचे वाटप विमल वैष्णव यांच्यातर्फ़े करण्यात आले. यावेळी तापीनदी प्रेमी भाविक उपस्थित होते.
यावेळी सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे यांनी २०० रोपे उपलब्ध करून दिली. या रोपांचे वर्षभर संगोपन करणा-यांना सेवा समितीतर्फे १०१ रुपये व सन्मान चिन्हासह प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे प्रशांत वैष्णव यांनी सांगितले.
तापीनदीच्या जन्मोत्सवाच्या यशस्वीतेकरीता गोविंद अग्रवाल, सखी श्रावणी महिला मंडळ सदस्या राजश्री नेवे, माया चौधरी, वंदना झांबरे, भाग्यश्री नेवे, निता माहुरकर, प्रतिभा विसपुते, निकीता खुशलानी, मंदाकिनी केदारे, रितीका चौरसिया, सप्तशृंगी माता बहुउद्देशीय संस्थेचे दिनेश महाजन, सचिन पाटील, जयप्रकाश शुक्ला, कैलास उपाध्याय, जे. बी. कोटेचा, पं.रवीओम शर्मा, अजय पाटील, नमा शर्मा, दीपक जैन, सत्यनारायण शर्मा, अभिलाष नागला, राजेश मुळे, बल्लू हेडा श्रीकृष्ण चोरवडकर, राजू गुरव, पूजा गुरव, सीना नेवे, अनुराधा टाक, अॅड. गोकुळ अग्रवाल, संतोष टाक आदींनी परिश्रम घेतले.



