रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे पदग्रहण उत्साहात :


भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हलीचा पदग्रहण दि ४ रोजी रोटरी हॉल मध्ये उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रो डॉ.निखिलेश त्रीवेदी, ताप्ती एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष मोहन फालक,माजी प्रांतपाल रो राजीव शर्मा,सहायक प्रांतपाल विकास पाचपांडे उपस्थित होते.द्वीप प्रजवलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी निखिलेश त्रिवेदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की भुसावळ शहरातील रोटरी क्लब ताप्ती व्हॅली चे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिवादन त्यांनी केले.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष रो नूतन फालक यांनी मावळते अध्यक्ष रो संजू भटकर ह्यांच्याकडून अध्यक्ष पदाची धुरा स्वीकारली.माजी अध्यक्ष रो सुधीर शर्मा यांनी रो मनीषा पाटील यांना सचिव पदाची सूत्रे सोपवली.या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.माजी प्रांतपाल रो राजीव शर्मा यांनी आपल्या मनोगतात भावी वाचालीसाठी शुभेच्या दिल्या. मोहन फालक यांनी रोटरी क्लब नेहमी समाज हिताची कामे करत असतो असे सांगून क्लबला भरभरून शुभेच्छा दिल्या.रोट्रॅक्ट क्लबचा अपूर्वा फेगडे,रिया चांदवणी यांनी सूत्र संचालन केले.रो संजू भटकर यांनी मागील वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी रजनी सावकारे,कमल सचदेव,डॉ.संगीताचांडक,अल्का भटकर,रुचीका शर्मा,वंदीता पारे,स्वाती देव,स्मिता फालक,कल्पना फालक,माधुरी गुजर,शोभा भोळे,ममता फालक,जी.आर.ठाकूर,राजेश अग्रवाल,महेश भराडे,संजय चांडक,प्रसन्न पांडे,भुषण महाजन,हिरामन फालक,अक्षय फालक,
उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी अध्यक्ष मुकेश अग्रवाल, माजी अध्यक्ष धमेंद्र मेंडकी,किशोर पाचपांडे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास माजी अध्यक्ष रश्मी शर्मा,ताप्ती एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन महेश फालक,प्रकाश फालक,रोटरी क्लबचे अध्यक्ष, सेक्रेटरी,इंनरव्हील क्लब चे पदाधिकारी,माजी अध्यक्ष,नवीन अध्यक्ष उपस्थित होते.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.