भुसावळ – ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर फेडरेशन व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने प्रमुख मागण्यांना मंजुरी मिळण्यासाठी भुसावळ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनांचा इशारा देण्यात आला आहे.

राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजना व्दारा सर्व परवानाधारक वर्ल्ड फुड प्रोग्रॅम अंतर्गत ४४० रुपये कमिशन प्रतिक्विंटल व किमान ५० हजार रुपये मानधन देण्यात यावे. फक्त गहू तांदूळ या खाद्यपदार्थावर एक किलो प्रति क्विंटल हँडलिंग लॉस देण्यावर सर्व राज्यांनी तात्काळ निर्णय घेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. सर्व राज्यातील स्वस्त धान्य दुकानावर गहू तांदूळ व्यतिरिक्त खाद्यतेल व डाळी दरमहा देण्यात याव्यात एलपीजी गँसच्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यात रेशन कार्ड वर असलेले एलपीजी गॅस सिलेंडरची विक्री नोंदणी करण्याची परवानगी देऊन त्यावर निश्चित कमिशन ठरविण्यात यावे तांदूळ गावाच्या गोण्या भरतांना जूटच्या बारदानामध्ये भरून देण्याबाबत व प्लास्टिकच्या गोण्या बंद करण्याबाबत केंद्र सरकारने आदेश काढून भारतीय खाद्य निगमला निर्देशित करावे.कोरोना महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांच्या कुटुंबाला ठराविक स्वरूपात मदत देश पातळीवर घोषित करून त्यांना कोरोना योद्धा म्हणून घोषित करण्यात यावे. केंद्र सरकारने वाढवलेले वीस रुपये व 37 रुपये कमिशनची रक्कम सर्व राज्य सरकारने तत्काळ अंमलात आणावी. पश्चिम बंगालच्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून सर्वांसाठी अन्न या योजनेअंतर्गत सर्व कारधारकांना मोफत धान्य देण्याची योजना आखण्यात यावी. पूर्ण देशाभरात ग्रामीण क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानदारांना डायरेक्ट प्रोक्रुटमेंट म्हणजेच सरकार द्वारा गहू तांदूळ भरड धान्य खरेदी करण्याचे परवानगी देण्यात यावी.
वरील सर्व मागण्यांबाबत देश पातळीवरील संघटनेच्या कार्यकारीणीने एक मुखाने मान्यता दिलेली असून त्यानंतर तालुका जिल्हा राज्य व पूर्ण देश पातळीवर सर्व परवानाधारक दिनांक 4 जुलै 2022 राज्यातील सर्व तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन दिनांक 11 जुलै 2022 राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयावर धरणे आंदोलन दिनांक 18 जुलै 2022 राज्यातील सर्व राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी म्हणजेच मुंबई येथे धरणे आंदोलन व मोर्चाद्वारे निवेदन राज्य सरकारला देण्यात येणार आहे दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर देशभरातील सर्व परवानाधारक आपल्या कुटुंबासह आपल्या
दुकानातील विक्रेत्यांसह लाखोच्या संख्येने एकत्रित होऊन संसदेवर घेरावासाठी जळगाव जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेचे मुख्य मार्गदर्शक मा. खा. श्री दत्ताजी मेघे संलग्न अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे व ऑल इंडिया फेयर प्राईज डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली राष्ट्रीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली राज्य उपाध्यक्ष भागवत पाटील जिल्हा सचिव सुनील अंभोरे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख कैलास उपाध्याय तालुका अध्यक्ष महेंद्र सपकाळे शहर अध्यक्ष आरिफ मिर्झ तालुका उपाध्यक्ष सी. आर. पाटील तालुका सचिव उल्हास भारसके शहर उपाध्यक्ष राजेश सैनी, ईश्वर पवार, नारायण वाणी यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे.


