भुसावळ – येथील आयोध्या नगर, हुडको काँलनी, सुभाष गॅरेज जवळील नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील दोघे बाजूंचे सर्व्हिस रोड पूर्ण करण्याच्या मागणी साठी आंदोलन करणाऱ्यांचे आंदोलन पोलिसांनी उधळून लावले.

भुसावळ शहरातील आयोध्या नगर, हुडको काँलनी, सुभाष गॅरेज जवळील रहिवासांनी महामार्ग जवळील रोडवर सर्विस रोडची मागणी गेल्या दोन वर्षापासून करीत आहे आज पर्यंत त्यांची मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही महामार्गालगत असलेल्या पुलाखाली मनुष्याच्या छाती एवढे पाणी तुंबलेले आहे त्यामुळे रस्त्यावरून ये जा करण्याकरिता या भागातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे .सर्विस रोडची मागणी पूर्ण करावी या मागणी करिता आज रहिवाशांनी आंदोलन केले असता प्रभारी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांना तुम्ही परमिशन घेतली आहे का ? असे विचारत आंदोलकांच्या आंदोलन स्थळी येऊन सदरचे आंदोलन उधळून लावले आहे या गोष्टीचा आंदोलकांनी निषेध व्यक्त केला आहे.
पोलिसांनी आंदोलकांना परवानगी बाबत विचारले असता आंदोलकांनी सांगितले की आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे जळगांव यांच्याकडे रीतसर अर्ज केलेला आहे तरीदेखील आमच्या आंदोलकांना पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दबंगगिरी करत पोलीस ठाण्यात उचलून नेले व त्यांना नोटीस दिली आहे या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करीत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.


