भुसावळ – भारत सरकारने सन २०१४ पासून स्वच्छ गवभारत अभियानाची सुरुवात केली आहे. याच अंतर्गत देशातील सर्व शाळा साठी सुरू केलेल्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार या वर्षी भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूल ने पटकला आहे.
सदर पुरस्काराचे वितरण दि.१८ जून रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते शाळेचे प्राचार्य डी एम पाटील यांनी सदर पुरस्कार स्वीकारला .
स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील शासकीय, अनुदानित व खाजगी शाळांनी पुरस्कारासाठी नामांकन सादर केले होते त्यात बियाणी मिलिटरी स्कूल ने ” फाईव स्टार रेटिंग ” मिळवले आहे त्या मुळे शालेय व्यवस्थापना सोबत शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

फोटो – पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार संजय सावकारे यांच्या कडून पुरस्कार स्विकारतांना बियाणी मिलीटरी स्कुलचे प्रिंसीपल डी एम पाटील.


