फैजपूर – आजही सर्वत्र लोक पूर्वीचे उदाहरण देतात की आजच्या काळात प्रमाणिकपणा शिल्लक राहिलेल्या नाही परंतु आज एका भुसावळ फैजपूर दरम्यान चालणाऱ्या रिक्षाचालकाने प्रमाणिकपणा दाखवून फैजपूर च्या सुभाष चौकात ते एका महिलेची बॅग त्याच्या रिक्षामध्ये विसरली होती त्या रिक्षाचालकाने स्वतः फैजपूर च्या वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून तपास करून हे बॅग कोणाची आहे अशी खात्री करून त्या महिलेचा फैजपूर पोलिसांच्या सहकार्याने मध्यस्थी करून महिले ची महत्त्वाच्या कागदपत्रासह बॅग प्रमाणिकपने परत केली.

भुसावळ येथील रिक्षाचालक इम्रान भाई यांनी दाखवलेल्या प्रमाणिक पणामुळे सर्वत्र कौतुक होत असून तसेच फैजपूर ते भुसावळ चालणाऱ्या रिक्षा चालक अनेक प्रवाश्यांना वेळोवेळी सहकार्य करत असतात भुसावळच्या इम्रान भाई ने केलेला प्रामाणिकपणामुळे सर्वत्र कौतुक होत आहे फैजपूर पोलिस स्टेशनचे एपीआय सिद्धेश्वर अखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस बाळू भोई आणि सलीम तडवी यांचे सहकार्य लाभले .


