नाहाटा महाविदयालयात अभिव्यक्तीं वार्षिक नियतकालिकाचे शानदार प्रकाशन. प्रकाशन सोहळ्यात झाला गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.!

भुसावळ – .भुसावळ कला विज्ञान आणि पु ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात, अभिव्यक्त ,या वार्षिक नियतकालिकेचं शानदार प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन फालक, चेअरमन महेश फालक,सचिव विष्णू चौधरी,कोषाध्यक्ष संजयकुमार नाहटा, प्राचार्या डॉ.मीनाक्षी वायकोळे,उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे, पर्यवेक्षक शोभा तळेले यांच्या शुभ हस्ते नुकतेच करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्यात इयत्ता बारावी मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबाचे रोपटे व नियतकालिकाचा अंक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे यांनी केले. या नियतकालिकांमध्ये महाविद्यालयाने राबवलेल्या विविधांगी उपक्रमांचं समतोल दर्शन होईल.या नियतकालिकाचा कडे अंकुरनाऱ्या कोंबकडे शेतकरी ज्या कुतुहलाचा आणि कौतुकाचा नजरेने पाहतो त्याच नजरेने आपण या नियतकालिकात कडे वाचकांनी पाहावं अशी अपेक्षा प्रा सुरवाडे यांनी बोलताना व्यक्त केली. महाविद्यालयाचा लागलेल्या घवघवीत निकालाचे श्रेय सर्वांचं असून यावर्षी उत्तम निकाल लागल्याबद्दल त्यांनी सर्वांच अभिनंदन केले.
या नंतर प्राचार्या वायकोळे म्हणाल्या की महाविद्यालयाचा निकाल केवळ संख्यात्मक लागला नसून गुणात्मक देखील वाढ उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे यांच्या कारकिर्दीत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली याबद्दल शिक्षकांचे कौतुक केले. त्यांना नवनवीन क्षेत्र निवडून जीवनात यशस्वी होण्याचा सल्ला याप्रसंगी त्यांनी बोलताना दिला.
नियतकालिक ज्या दिवशी विद्यार्थ्यांचा निकाल लागला आणि लिव्हिंग सर्टिफिकेट चा वाटप करण्यात येत आहे अगदी त्याच दिवशी नियतकालिकाचा वितरण करण्यात आल्याबद्दल विशेष समाधान व्यक्त करून डॉ मोहम फालक यांनी संपादक प्रा.श्याम दुसाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केलं.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार श्याम दुसाने यांनी मानले. विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.