यावल तालुक्यातील शेतकरी बांधवां करीता कापुस उत्पादन वाढ तंत्रज्ञानावर आधारित पिक प्रात्याक्षिक व मार्गदर्शन : नाव नोंदणीचे आवाहन :


यावल – नेवे फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे
राज्य पुरस्कृत एकात्मिक कापुस पिकाची उत्पादकता
वाढ व मुल्य साखळी विकास योजना २०२२-२३ चे यावल तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे .
कापुस लागवड करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवयाचे करीता साकळी, शिरसाड,
मनवेल या शिवारातील कापुस पिकावर प्रकल्प राबविण्यात येत आहे.
कापुस उत्पादन वाढ तंत्रज्ञानावर आधारित पिक प्रात्याक्षिक व मार्गदर्शन करण्यात येईल .
तरी कापुस पिकाची लागवण
करणारे इच्छूक शेतकरी बांधवांनी महा डि. बी. टी. या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे.
या प्रकल्पात भाग घेणाऱ्या शेतकरी बांधवांना कृषि विभागा द्वारे मिळणारे फायदे

  • बियाणे
    1 = ४०० रु. अनुदान बिज प्रक्रीयासाठी ट्रायकोडर्मा + लिक्विड कॉन्सरशिया २५० ग्रॅम
  • अन्नद्रव्य व्यवस्थापन = फुले मायक्रोन्युटीएन ग्रेड २ फेरोमेल ट्रॅप ल्युर्स (पेक्टीनो)
  • अॅझेटेरॅक्टीन १५०० पीपीएम प्रोफीनोफॉस ५०% ईसी विशेष माती नमुना तपासणी.
    प्रकल्पात भाग घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी कृषि कार्यालय, यावल. किंवा नेवे फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.
    च्या खालील व्यक्तिंशी संपर्क साधावा अथवा https://mahadbtmahait.gov.in/farmer/logoin/login

या वेबसाईट वर अर्ज करावा.

  • आवश्यक कागद पत्रे –
    (७/१२ उतारा, खाते उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक)
    अधिक माहितीसाठी संपर्क –
    एच.पी. चौधरी (कृषी सहाय्यक) ७५८८८१६९१२
    नेवे फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. ९९२११९९७७७ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .