एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिवस उत्साहात साजरा”


जळगाव – श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी,जळगाव येथे विद्यार्थी कल्याण विभाग, क्रीडा विभाग , सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. बी. पवार हे उपस्थित होते व सर्व प्रथम त्यांच्या हस्ते शिवप्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर आनंद पुरी या बाल शाहिराने शिवाजी महाराज व संभाजी महाराजांवरील अतिशय रोमांचक असा पोवाडा सादर केला व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
त्यानंतर मेकॅनिकल विभागातील श्री प्रवीण पाटील यांनी शिवराज्याभिषेक दिवस याविषयी माहिती दिली व त्यानंतर समाजात काय बदल झाले याविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागातील सहायक अधिकारी दिनेश पुरी व आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी एन. एम. काझी यांनी केले.
या वेळी एस एस बी टी आर्ट, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एल. पाटील, क्रीडा विभागाचे प्रमुख जे. बी. सिसोदिया, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख . महेश रावलानी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख. व्ही. एस. पवार, डॉ. एस. पी. शेखावत, डॉ .के .पी .अधिया, डॉ. एस. आर. सुरळकर आदी मान्यवर उपस्थित होते.