भुसावळ आयुध निर्माणीचे महाव्यवस्थापक म्हणून अनुराग एस. भटनागर यांनी पदभार स्वीकारला :


भुसावळ – आयुध निर्माणी भुसावळचे महाव्यवस्थापक म्हणून अनुराग एस. भटनागर यांनी नुकताच १ जून २०२२ रोजी
महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
आयुध निर्माणी भुसावळ परिवाराचे प्रमुख झाल्याबद्ल
सर्व अधिकारी व युनियन असोसिएशन चे पदाधिकारी जेसीएम थ्री जेसीएम फोर्थ मेंबर कार्यसमिति सदस्य व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले व अपेक्षा व्यक्त केली की, त्यांच्या कार्यकाळात कारखाना विकासाच्या सर्व क्षेत्रांत कार्यक्षमता
वाढेल , उत्पादनातील उत्तम दर्जा आणि उत्तम व्यवस्थापन आणि सुशासन या आदर्शाचे पूर्णपणे पालन होईल.
अनुराग एस. भटनागर म्हणाले की, आयुध निर्माणी भुसावळच्या महाव्यवस्थापकपदाचा कार्यभार स्वीकारताना मला अतिशय आनंद होत आहे.
आयुध निर्माणी भुसावळमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी आजपर्यंत केलेले काम व सेवा काळात आलेले अनुभव सांगितले व सांगितले की, गेली 32 वर्षे आयुध निर्माणी संघटन मध्ये असताना देशाची सेवा केल्याचा मला अभिमान आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ ही संरक्षण उत्पादनांसाठी पॅकेजिंग बॉक्स आणि
पिनाका पॉड्स इत्यादींच्या उत्पादनांचा दर्जा आणि उत्पादकता वाढविण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करून प्रशासनात संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सर म्हणाले की 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी संरक्षण उत्पादनांसाठी स्टील पॅकेजिंग बॉक्ससह पिनाका पॉड्सचे उत्पादन लक्ष्य नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
अनुराग एस. भटनागर
1990 पासून ऑर्डनन्स फॅक्टरी ऑर्गनायझेशन
मध्ये सेवा प्रवास सुरू केला
आणि नॅशनल डिफेन्स प्रोडक्शन अकॅडमी नागपूर, व तोफगोळा फॅक्टरी जबलपूर ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड कोलकाता, ऑर्डनन्स फॅक्टरी कानपूर
रायफल फॅक्टरी आणि इच्छापूर इत्यादी विविध कार्यक्षेत्रात त्यांनी नेतृत्व करून प्रतिभा दाखवून अतुलनीय कार्य केले आहे. मानव संसाधन विकास, स्थापना आणि प्रशासन, दक्षता, कामगार कल्याण,
माहिती तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रातील तज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अतिशय शिस्तप्रिय महाव्यवस्थापकांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिस्तीचे पूर्णपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
आयुध निर्माणी भुसावळच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना असा विश्वास
आहे
अनुराग एस. भटनागर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली कारखाना संरक्षण उत्पादनासह आयुध निर्माणी आणी वसाहतींच्या विकासाच्या सर्व क्षेत्रांत प्रगती करेल.
सर्व अधिकारी व युनियन असोसिएशनचे पदाधिकारी जेसीएम थ्री जेसीएम फोर्थ मेंबर कार्यसमिति सदस्य व कर्मचाऱ्यांनी अनुराग एस. भटनागर, सरव्यवस्थापक यांना आश्वासन दिले की पूर्ण कार्यक्षमतेने काम करून यशाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचू
अशी माहिती आयुध निर्माणी चे पी.आर.ओ
बी देवीचंद (डीजीएम)
यांनी दिली .