यशवंत प्रतिष्ठान,रावेर व महिला पर्यावरण सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांना कापडी पिशव्या शिवण्याचे प्रशिक्षण :

रावेर – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यशवंत प्रतिष्ठान व महिला पर्यावरण सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना कापडी पिशव्या शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले
समाजात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वाढता वापर व त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी आपण आपले नैतिक कर्तव्य म्हणून पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे या उद्देशाने महिलांना कापडी पिशव्या शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यासाठी महिलांनी कापड, शिवणकामाचे साहित्य स्वतः उपलब्ध केले तसेच महिला पर्यावरण सखी मंच अध्यक्षा नयना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सौ जयश्री पाटील व सर्व सख्यांनी एकमेकांच्या सहकार्याने 200 पिशव्या तयार केल्या प्रत्येकाने आपल्याला जमेल तशी मदत व सहकार्य केले.