भुसावळात गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा :


भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. ह्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मुजरा करून मानवंदना देण्यात आली.
ह्या दरम्यान बोलतांना प्राचार्य डॉ आर बी बारजिभे यांनी अवघ्या देशाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिवसाची आठवण म्हणून साजरा होणारा शिवराज्याभिषेक दिनाचा दिवस हा अवघ्या भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे असे सांगितले. बुद्धी, शौर्य, धडाडी, निष्ठा आणि धैर्य या जोरावर महाराजांनी शत्रूंना पराभूत करून स्वराज्य घडवले. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राज्यकर्ते होते आणि येणाऱ्या पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत असतील तसेच भावी अभियंते व अभियंत्यांनी महाराजांचा  आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रनिर्माणाचा ध्यास घेत  त्याप्रमाणे कृती करण्याचा निश्चय करण्याविषयी मार्गदर्शन केले. 

हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी,  सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड यांनी  शुभेच्छा दिल्या. 

सदर कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख प्रा.अविनाश पाटील, डॉ. एस.बी. ओझा, डॉ.पंकज भंगाळे, डॉ..ए.पी.चौधरी,  डॉ.डी.डी.पाटील ,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनींची उपस्थिती होती.