भुसावळात शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर शुभेच्छाचां वर्षाव : गरजुंनी दिले अनेकोत्तम शुभाशिर्वाद : वाढदिवसानिमित्त गरजू नागरिकांना धान्याचे वाटप : एक हात मदतीचा शिवभोजन केंद्राचे संचालक नमा शर्मा यांचा उपक्रम ;


भुसावळ – जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शहरातील गोरगरीब नागरिकांना अन्न धान्य वाटप तसेच शिवभोजन केन्द्रातर्फे मिष्ठान भोजन वाटप भुसावळ शिवभोजनचे संचालक उमाकांत उर्फ नमा शर्मा यांनी केले.यावेळी नागरिकांनी शिवसेनेेेचे कौतुुक करीत ना गुलाबराव पाटिल याना भरभरून आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या . तर नागरिकांसह शिवसेना पदाधिकारी यांनी एकमेकांना लाडू भरवून वाढदिवसाचा जल्लोष साजरा केला. नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
कोरोना काळात अनेक नागरीकांच्या हाताचे काम गेले, काहींवर उपासमारीची वेळ आली. एक हात मदतीचा हा उपक्रम राबवून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार 100 टक्के समाजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे असे शर्मा यांनी सांगितले.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख जगदीश कापडे,उपजिल्हासंघटक विलास मुळे, संतोष सोनवणे, धीरज पाटील, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, वरणगाव शहरप्रमुख निलेश ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, हेमंत खंबायत, उपशहर प्रमुख राकेश खरारे, जवाहर गौर, विभागप्रमुख अरुण साळुंखे, नाना मोरे, गोलू कापडे, अमजद खान, अमोल भालेराव, जेष्ठ शिवसैनिक गजानन निळे, शरद जोहरे, धीरज वरढोनकार, पवन मेहरा यांचेसह असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.