साकेगाव येथील कै. यशोदाबाई सराफ बी. फार्मसी महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची उत्तराखंडच्या नामंकित कंपनीत निवड ;


भुसावळ – साकेगाव येथील कै. यशोदाबाई दगडु सराफ चेरिटेबल ट्रस्ट संचलीत बी. फार्मसी
महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांचे ‘प्रितम इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड’ (पार्ट ऑफ
वंडर गृप) रोरकी उत्तराखंड या नामंकित कंपनीत निवड करण्यात आलेली आहे. ग्रामिण
भागातील विदयार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा हा संस्थेचा मानस आहे. धनश्री रामराव शिंदे,
दिव्या नरेंद्र भोळे या विद्यार्थीनींची QA विभागात आणि अविनाश नंदु पाटील या
विदयार्थ्याची प्रोडक्शन विभागात निवड करण्यात आली.
निवड झालेल्या विदयार्थ्यांचे संस्थेचे
अध्यक्ष पांडुरंग सराफ , सचिव संजय इंगळे , कॉलेजचे प्राचार्य डॉ.
पी. आर. पाटील यांनी अभिनंदन केले तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्या
विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.