आज येथील प्रहारचे शहर अध्यक्ष प्रकाश कोळी व भरत कोळी यानी निवेदनाद्वारे केली . कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील
प्राचार्यांची मान्यता काढून घेतल्याबाबत आज प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडु जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतांना भुसावळ शहर प्रहार अध्यक्ष यांचेसह पदाधिकारी
उपस्थित होते .

उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ याचिका क्रमांक
523/2020 तसेच जनहित याचिका क्रमांक 23/2017
, यांना अनुसरून, निवेदन दिले आहे की, संबंधित उत्तर
महाराष्ट्र विद्यापीठाने, भुसावळ येथील प.क.कोटेचा महीला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा
यांची प्राचार्य पदाची मान्यता 2019 मध्ये काढून घेतलेली आहे. या कारवाई विरुद्ध संबंधित प्राचार्य आणि
संस्थेने मिळून उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ याठिकाणी याचिका क्रमांक 523/2020 दाखल केलेली आहे
सदर याचिका कोर्टात चालविताना विद्यापीठाचे वकील व सरकारी वकील याचिका चालवण्यासाठी जाणूनबुजून दिरंगाई करीत आहे. प्राचार्यपदाची मान्यता काढल्यामुळे हा विषय शासकीय निधीशी संबंधित आहे .
शासनाचे करोडो रुपये या बेकायदेशिर नियुक्त्यावर खर्ची पडत आहे! त्यामुळे
सदरची याचिका फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून ताबडतोब निर्णय होईल अशी व्यवस्था आपण करून द्यावी तसेच उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी जनहित याचिका क्रमांक 23/2017 बऱ्याच
दिवसापासून निर्णयासाठी प्रलंबित आहे या ठिकाणी देखील संबंधित विद्यापीठाचे वकील व सरकारी वकील
याचिका चालविण्यास दिरंगाई करीत आहे. विशेष बाब म्हणजे या दोन्ही प्रकरणात विद्यापिठाने चौकशी
समिती नेमुन वस्तुनिष्ठ, सत्य व कायदेशीर बाबी लक्षात घेवुन अहवाल सुध्दा न्यायालयात सादर केलेला
आहे या दोन्ही याचिका फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्वरित निर्णय मिळेल अशी व्यवस्था करावी अशी मागणी
भरत कुंदन तायडे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे .


