भुसावळ – भुसावळ विभागाचे वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक .डॉ. शिवराज मानसपूरे यांनी अमरावती स्टेशनचे निरीक्षण साठी जाताना तिकीट तपासणीस यांना सोबत घेऊन गाड़ी क्रमांक 11040 अप व 11039 डाउन गाड़ीची तपासणी केली .यावेळी सोबत वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक शैलेश पारे, तिकीट चेकिंग स्टाफ सतनाम सिंग , बी पी सिंग , राजकिशोर सिंग व वाय आर नावकर होते
यावेळी 112 केसेस करण्यात येवून विण्या तिकीट अवैध प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून 51 हजार 350 रुपये राजस्व वसूल करण्यात आला .
वरीष्ठ वाणिज्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. शिवराज मानसपूरे यांनी प्रवाश्यांना आवाहन केले आहे की प्रवाशांनी योग्य तिकिटासह योग्य गाडीत प्रवास करावा .



