मा. राज्य अन्न आयोगाचा जिल्हा दौरा: शिक्षकांना उपस्थितीची सक्ती का? प्र. ह. दलाल ह्यांचा संतप्त सवाल!

भुसावळ – मा आयोगाचा जिल्हा दौरा २२/५/ते २४/५/ह्या कालावधीत निश्चित झाला आहे सदर आयोग २४/५/रोजी जिल्ह्यातील शाळांवर शापोआ विषयी भेट देणार आहे त्या साठी शापो आ. रेकॉर्ड अद्ययावत ठेऊन सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शा. पो. आ. च्याकर्मचाऱ्यांनी दि.२४/५/रोजी सकाळी १०ते सायंकाळी ६पर्यंत पुर्ण वेळ उपस्थित राहावे असा संदेश गट शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी पत्राचा संदर्भ देऊन आज मोबाईल वर पाठविला आहे. हा सर्वच प्रकार शिक्षकांवर अन्याय करणारा आहे याकरीता .मा. राज्य अन्न आयोगाचा जिल्हा दौरा शिक्षकांना उपस्थितीची सक्ती का? असा संतप्त सवाल प्र. ह. दलाल ह्यांनी केला आहे

मा आयोगाचा जिल्हा दौरा २२/५/ते २४/५/ह्या कालावधीत निश्चित झाला आहे सदर आयोग २४/५/रोजी जिल्ह्यातील शाळांवर शापोआ विषयी भेट देणार आहे त्या साठी शापो आ. रेकॉर्ड अद्ययावत ठेऊन सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शा. पो. आ. च्याकर्मचाऱ्यांनी दि.२४/५/रोजी सकाळी १०ते सायंकाळी ६पर्यंत पुर्ण वेळ उपस्थित राहावे असा संदेश गट शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी पत्राचा संदर्भ देऊन आज मोबाईल वर पाठविला आहे. हा सर्वच प्रकार शिक्षकांवर अन्याय करणारा आहे

१) राज्य अन्न आयोगाला राज्यातील शाळांना सद्या उन्हाळ्याची दीर्घ सुटी आहे. हे माहीत नाही का? दौरा आयोजित करण्यापूर्वी निदान आपण ज्या शाळांमध्ये जाणार आहोत त्या शाळा सुरू आहे की नाही याची आगोगाने खात्री करून घ्यायला नको का? नेमका सुट्यांमध्ये च दौरा काढण्याचे प्रयोजन काय?१५/२०दिवसानंतर काढला असता तर काय बिघडले असते?२) सुट्यांमध्ये शिक्षक आपल्या गावी किंवा खाजगी कामासाठी बाहेर गावी गेलेले असण्याची शक्यता नाही का? मग केवळ एक दिवस आधी व्हॉट्स ॲप वर शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहावे असा आदेश मान. शिक्षणाधिकारी तरी कसा देऊ शकता? ३) महत्वाचे म्हणजे श.पो. आ. च्या कामाचा व शिक्षकांचा काहीही संबंधच नाही. ते शिक्षकांचे काम च नाही ही बाब खुद्ध शासनाच्या च परिपत्रकानुसार स्पष्ट झालेली आहे ही बाब शिक्षणाधिकारी तरी कसे विसरतात ? शिक्षक म्हणजे रो. ह. यो. चे कामगार नाही . हा त्यांचेवर अन्याय असून ह्याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून निषेध नोंदविणार असल्याचे भा. ज. पा. शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य व ज्येष्ठ शिक्षक नेते प्र. ह. दलाल ह्यांनी कळविले आहे.