भुसावळ शहरात श्री पांडुरंग आणि निवृत्तीनाथ महाराज पादुका पालखी सोहळा ! –

भुसावळ –भुसावळात श्री पांडुरंग आणि निवृत्तीनाथ महाराज पादुका पालखी सोहळा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त
शहरात दिनांक 24 मे 2022 मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजता अष्टभुजादेवी मंदिरापासून ते श्री.विठ्ठल रुख्मिणी मंदिर,विठ्ठल मंदिर वॉर्ड,भुसावळ पर्यंत श्री पांडुरंग आणि निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर पादुका पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात येणार आहे.

श्री पांडुरंग आणि निवृत्तीनाथ महाराज पादुका पालखी दिंडी मिरवणूक नंतर पादुका दर्शनासाठी मंगळवार दि.24 मे 2022 रोजी सायं.7 ते 10 विठ्ठल मंदिर मध्ये ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व पांडुरंग भक्तांनी तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी अवश्य सहभाग घेऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.विठ्ठल रुख्मिणी मंदिर विश्वस्त विठ्ठल मंदिर संस्था,भुसावळ संचालकांकडून करण्यात आले आहे.