भुसावळ – नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र, सक्षम सेवा फाउंडेशन,
मानवतकर बहुद्देशीय संस्था तसेच सक्षम नारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 31 मे रोजी जागतिक पातळी वर साजऱ्या होणाऱ्या धूम्रपान विरोधी दिवसा निमित्त
पुढील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

1) निबंध स्पर्धा
विषय- युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता (शब्दमर्यादा 300 शब्द)
2) कविता स्पर्धा
विषय- व्यसनाधिनता
3)पोस्टर मेकिंग स्पर्धा विषय- धूम्रपान
4) घोषणा (स्लोगन स्पर्धा)
*विषय- व्यसनाधिनता
नियम -भाग घेणा-या स्पर्धकाने संपूर्ण नाव, पत्ता, वय, व व्यवसाय याचा स्पष्ट उल्लेख करावा
1) निबंध स्पर्धा व कविता दिनांक 27/5/ 22 पर्यंत
संध्याकाळी 5 पर्यंत
95 11 22 92 12 या नंबर वर आपल्या संपूर्ण नाव गाव ,वय व व्यवसाय सहीत व्हॉट्सऍप वर पोस्ट करावे.
2)पोस्टर मेकिंग स्पर्धेचे पोस्टर व घोषणा स्लोगन मेकिंग स्पर्धेचे स्लोगन
मानवतकर हॉस्पिटल आनंद नगर तसेच अर्पण हॉस्पिटल
कुलकर्णी प्लॉट कोर्टाच्या मागे या ठिकाणी रिसेप्शन काउंटर वर 27/5/22 पर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जमा करावे.
3)प्रत्येक स्पर्धेचे बक्षीसे स्वतंत्र राहतील
4) स्पर्धेसाठी वयाची कोणतीही अट नाही.
5) संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून साहित्य स्वीकारले जाईल. 6)निवड समितीचा निर्णय अंतिम निर्णय असेल.
7)स्पर्धेसाठी प्रवेश निशुल्क आहे
30 मे 2022 सोमवार रोजी संध्याकाळी 5 ते 7 रेल्वे लिम्पस कल्ब हॉल ,40 बंगला भुसावळ येथे भुसावळ रेल्वे विभाग एडीआरएम रुकमैया मीना यांचे
हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी
नवजीवन व्यसनमुक्ति केंद्र
95 11 22 92 12
येथे संपर्क साधावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.


