भुसावळ :
परशुराम जयंती उत्सव समिती 2022 च्या वतीने यंदा परशुराम जन्मोत्सवानिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमाच्या आयोजना नंतर जन्मोत्सवाच्या यशस्वितेसाठी मेहनत घेणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा काल बडा हनुमान मंदिरात श्रमपरिहाराचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात ऑनलाईन स्पर्धेच्या माध्यमातून विविध चित्र, गीते भजन, सादर करून ज्या स्पर्धकांनी यश मिळवलं त्यांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये लहान बालक रुद्र शर्मा, अश्विनी शर्मा, विवेक उपाध्याय, यांना सम्मान चिन्ह (ट्रॉफ़ी),रोख रक्कम, आयुर्वेदिक औषधी वाटप करून गौरव करण्यात आला. याप्रसंगी जन्मोत्सव समितीने यंदाच्या जन्मोत्सवासाठी झालेला खर्च देखील सादर केला. यावेळी श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितिचे जेष्ठ पदाधिकारी कैलास उपाध्याय, प्रशांत वैष्णव, जयप्रकाश शुक्ला, समिती अध्यक्ष उमाकांत शर्मा (नमा),दीपक पाथरकर, आशिष तिवारी, देवेश कुलकर्णी, भूषण वैद्य, आनंद जोशी, सागर पतकी,अनिरुद्ध कुलकर्णी, आशुतोष दलाल, प्रशांत उपासनी, केऱ्हाळकर गुरुजी, संकेत कुलकर्णी,संदेश शुक्ला,गणेश वड़वेकर,शंतनु गचके, खुशाल जोशी, आदित्य शर्मा आदि समाज बांधव उपस्थित होते. या वर्षी खुप चांगल्या प्रकारे सर्व ब्राह्मण समाजातील महिला, पुरुष, तरुण वर्ग, जेष्ठांची उपस्थित होती. प्रत्येक कार्यक्रमा पुढच्या वर्षी या पेक्षा ही समाजातील अधिकाधिक
भव्य-दिव्य शोभायात्रा काढून ब्राह्मण समाजाची एकता व संगठन भुसावळकरांना अनुभवायला मिळेल.या वर्षी समितीला पूर्ण समाज बांधवानी सहकार्य केले त्यांचे समिती तर्फे ऋण व्यक्त केले .
पुढच्या वर्षी जे अध्यक्ष असेल त्याला सुद्धा तन, मन, धनाने सहकार्य करणार असे समस्त ब्राह्मण समाजाच्या व समितीच्यावतीने ग्वाही उमाकांत शर्मा (नमा)यांनी यावेळी दिली . पुढे भविष्यात संपूर्ण भुसावळ शहरातील ब्राह्मण कुटुंबांची यादी तयार करण्याचा मानस आहे. शहरात,सावरकर चौक, परशुराम चौक, वधु- वर मेळावा घेण्याचा समाजाचा मानस असल्याचे अध्यक्ष नमा शर्मा यांनी सांगीतले .



