भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतरंग 2022 अंतर्गत क्रीडा स्पर्धांची सुरुवात करण्यात आली.
उद्घाटनाप्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ आर बी बारजिभे यांनी कोरोना मुळे शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रांसमोर मोठी आव्हाने निर्माण केली होती. खेळ हे संघ भावना ठेवत कठीण परिस्थितीतून मार्ग काढायला शिकवतात. शारीरिक, सामाजिक, मानसिक, तसेच बौद्धिक जडण-घडण आणि वाढ होण्यास खेळ फारच उपयुक्त ठरतात. सहकार्याने आणि खेळीमेळीने खेळ खेळत विद्यार्थी व विद्यार्थिनी इतरांशी मिळते जुळते घेण्यासही शिकतात. सांघिक खेळांमुळे संघभावना तर वाढीस लागतेच पण खेळांमुळे कल्पकता वाढीस लागते आणि त्याहून महत्वाचे म्हणजे खेळ जय आणि पराजय यांचा सामना करण्यास शिकवतात, पराभव पचवण्यास शिकवतात, नियमांचे पालन करण्याची सवय लावतात, संघटनात्मक बांधणी आणि स्वःताच्या गुणांची पारख करणे, जीवनात नियोजनबद्धता शिकणे ह्या दृष्टीनेही खेळांचे महत्व असल्याचे सांगितले.
उद्घाटनाला प्राचार्य डॉ आर बी बारजिभे , अंतरंग 2022 चे आयोजन प्रमुख डॉ.डी.डी.पाटील, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. गजानन जाधव, प्रा. डि. जी. अग्रवाल, क्रीडा प्रशिक्षक वाय. एम. जोशी, प्रा. मनीष माटा, प्रा, नितीन खंडारे, डॉ. नीता नेमाडे, प्रा. अनिकेत पाठक व खेळाडू यांची उपस्थिती होती.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड यांनी शुभेच्छा दिल्या.



