नातीशी लग्न करण्यास विरोध : संतप्त भाच्याचा आत्यावर हल्ला : गुन्हा दाखल :


भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथे नातीसोबत लग्न करण्यास आत्याने विरोध केल्याने भाच्याने आत्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटनचा १६ रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत भाच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र आत्माराम भंगाळे (वय २५, रा. विचवे ता. बोदवड) याने साकेगाव येथील आत्याच्या नातीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव आत्या सुमनबाई पवार (वय५५) यांच्याकडे ठेवला होता. मात्र आत्याने या लग्नाला स्पष्टपणे विरोध केल्याने संतप्त झालेला रवींद्र आत्याच्या घरी गेला व आत्याला जीवे मारण्याच्या उद्देश्याने नाका तोंडावर उशी ठेवून त्यांच्या गळ्यावर, मानेवर, हातावर धारदार शस्त्राने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत तालुका पोलिसात सुमनबाई हिरामण पवार यांच्या फिर्यादीवरुन रवींद्र याच्या विरुद्ध गु.र.नं. ७१/२०२२, भा.दं.वि. ३०७, ४५२, ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनी अमोल पवार करित आहे .