भुसावळातील स्वप्नील शर्मा एमबीबीएस पदवी प्राप्त :


भुसावळ, : येथील डॉ स्वप्नील शर्मा यांनी एमबीबीएस पदवी प्राप्त केली. नुकत्याच नाशिक येथे डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित पदवीदान समारंभात त्यांनी पदवी स्विकारावी. एकुण ११७ विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान व शपथ ग्रहण विधी पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, कॉलेजच्या डीन डॉ मृणाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ स्वप्नील शर्मा हे रेल्वेतील लोकोपायलट एम. डी. शर्मा यांचे चिरंजीव आहेत. पदवीदान समारंभासाठी सर्व विभागाचे प्रमुख, स्टाफ, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.