भुसावळ –

भुसावळ विभागात डॉ . श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत पद्मश्री आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त दि १५ मे २०२२ वार रविवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे आयोजन भुसावळ येथील माळी लॉन्स, यावल येथील शासकीय रुग्णालय,व चोपडा येथील ग्रामीण रुग्णालयात आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले . तीनही ठिकाणी सकाळी ८ वाजता शिबिराला सुरुवात झाली .
भुसावळ येथे आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले .त्याचप्रमाणे यावल येथील शिबिराचे उद्घाटन आशीष नामदेव कांबळे I P S यावल यांच्या हस्ते करण्यात आले . उद्घाटनानंतर आमदार संजय सावकारे , भाऊराव हिरे शासकीय रक्तपेढी धुळे यांच्या डॉ .मिलन पलाडीया , व इतर टीमचे स्वागत करण्यात आले .त्यानंतर डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली गेली.संजय सावकारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आदरणीय आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत केल्या जाणाऱ्या विविध कार्याबद्दल जसे वृक्ष लागवड व संवर्धन विहीर बोअरवेल पुनर्भरण विशेषतः स्वच्छता अभियान , रक्तदान शिबिर, ई . विविध कार्यक्रमातून श्री सदस्यांच्या माध्यमातून अतिशय शिस्तबद्ध रीतीने कुठलाही गवगवा न करता कार्य करण्याच्या पद्धतीचे विशेष कौतुक केले . श्री समर्थ बैठकांच्या माध्यमातून माणसातील माणुसकी जिवंत ठेवून देशाचे उत्तम नागरिक घडविण्याचा ध्यास धर्माधिकारी परिवार गेली कित्येक वर्ष जपत आहे त्याबद्दल विशेष कौतुक व्यक्त केले . धर्माधिकारी प्रतिष्ठान प्रमाणे निस्वार्थ कार्य करण्याची प्रेरणा इतरही संस्थांनी घ्यायला हवी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले .रक्तदान शिबिरात पहिल्यांदाच रक्त देण्यासाठी एवढी मोठ्याप्रमाणावर रांग पाहावयास मिळाली असे देखील मत त्यांनी व्यक्त केले .कार्यक्रमात शेवटी संजय भाऊ सावकारे ,भाऊसाहेब हिरे रक्तपेढी धुळे यांचे व श्री कैलासभाऊ महाजन यांनी माळी भवन शिबिरासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
भुसावळ येथे १३८ यावल येथे ७३ व चोपडा येथे ५९श्री सदस्यांनी असे एकूण २७० श्री सदस्यांनी रक्तदान केले.


