भुसावळ – तालुक्यातील जाड़गाव ग्रामपंचायत मधील राम मंदिरात भुसावळ येथील परम पूज्य श्री निर्मला देवी प्रणीत सहजयोग ध्यान केंद्र परिवार व अध्ययन पॅरामेडीकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जाड़गाव परिसरातील नागरिकांसाठी आज 17 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळी सहजयोग चिकित्सा व मोफत शारिरीक व मानसिक आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप आणि व्यसनमुक्ति मार्गदर्शन अशा पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
या वेळी गावचे सरपंच
निखिल सुरवाड़े यांनी पुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले.
व श्रीरामांची पूजा करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी सहजयोग परिवराच्या तालुका प्रमुख यामिनी सोनावणे यांनी उपस्थित नागरिक व विद्यार्थ्याना
सहजयोग व ध्यानधारणेमुळे आपले जगणे कसे सहज होते व शरीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ़ राहण्यासाठी प्रत्येकाने सहज योग करणे आवश्यक आहे,तसेच उपस्थित विद्यार्थी वर्गास अभ्यास करतांना सहजयोगच्या माध्यमातुन आभ्यासात कसे लक्ष केंद्रीत करावे हे विणा ठाकुर यांनी पटवून दिले . यावेळी साक्षी कदम व मनीषा गोस्वामी यांनी सहजयोगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
तदनंतर डॉ वंदना वाघचौरे यांनी उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करुन व्यसनांपासुन परावृत्त राहून आरोग्याची काळजी कशी घ्यावी है सांगितले ,
अध्ययन पॅरामेडिकलच्या टीमने उपस्थित नागरिकांना आवश्यक ती औषध वाटप केले,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
प्रजावती तायड़े ,प्रशांत सोनार , सायली साबळे, नकुल थोसार ,शाहिद शेख यांनी परिश्रम घेतले.



