यावल – येथील एसटी आगारातून भुसावळ साठी निघालेल्या बस क्रमांक एम एच 20 बी एल 2542 हिच्यावर भुसावळ रस्त्यावरील घोडे पीर बाबाच्या दर्गा जवळ अचानक चिंचेचे झाड कोसळले मात्र, चालक शालिक बारी यांनी प्रसंगावधान राखल्याने सर्व प्रवासी बालबाल बचावले मात्र १३ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच यावल आगाराचे व्यवस्थापक जी. पी. जंजाळ यांनी सर्व प्रवाशांना रूग्णालयात आणण्यासाठी व्यवस्था केली तर घटनास्थळी किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन या मार्गस्थ होत असतांना त्यांनी तातडीने जखमींना मदत केली सर्व जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला. डॉ. मनीषा महाजन, अधिपरचारिका ज्सोना निंबाळकर, वैशाली बैरागी, पूनम सोनवणे, हेमलता कावडकर, पिंटू बागुल, इरफान तडवी आदींनी केले आहे. तसेच यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक जी पी जंजाळ, वाहतुक निरिक्षक कुंदन वानखेडे, सहायक वाहतुक निरिक्षक कमलाकर चौधरी, वाहतुक नियंत्रक के. डी. चौधरी, डी.एन. ठाकरे आदींनी किरकोळ जखमींना तातडीने ५०० रूपये तर काहींना एक हजार रूपयांची मदत देण्यात आली. या अपघातात चालक शालिक बारी, वाहक एस. पी. महाजन तसेच प्रवासी जहांगीर सिकंदर तडवी वय ३४ रा. चुंचाळे, कल्पना सतीश चौधरी वय ५५ रा. डोंबवली, मंगला रामदास चौधरी वय ५५ रा. वडोदा, दीपक वानखेडे वय २४ रा. चुंचाळे, इच्छाराम टिकाराम राजपूत वय ७० रा. सांगवी खुर्द, पंडित लक्ष्मण परणकर रा. भास्कर नगर यावल, शकुंतला विलास चौधरी वय ६० रा. धानोरा, दिपक टोपलू वानखेडे वय २४ रा. चुंचाळे – बोराडे, पद्माबाई रमेश कोळी वय ५० रा. निमगाव, सुशिलाबाई किसन धनगर वय ४२ रा. मुक्ताईनगर, नीलम शैलेंद्र पाटील वय १९ रा. दहिगाव, जोहराबाई रशीद खाटीक वय ४७ रा. आडावद ता. चोपडा, शिवाजी भीमराव गजरे रा. चुंचाळे असे १३ जण जखमी झाले आहेत



