श्रीसंत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात कोडींग-डिकोडिंग चॅलेंज उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात बहुराष्ट्रीय उद्योगांना अपेक्षित कुशल तंत्रज्ञ घडवण्याच्या उद्देशाने कोड फँटम या नावाने कोडिंग-डिकोडिंग क्लब ची स्थापना करण्यात आली आहे. कोडिंग आणि प्रोग्रॅमिंग मधील मूलभूत तंत्र आणि ज्ञान संपादन करून त्यातील युक्त्या, प्रयुक्त्या यांचा वापर करत बहुराष्ट्रीय उद्योगांना अपेक्षित कुशल अभियंते उपलब्द करून देण्याच्या दृष्टिकोनातून कोड फँटम क्लबने सर्व वर्षांच्या विद्यार्थी व विद्यार्थिंनींसाठी “कोडींग-डिकोडिंग चॅलेंज ” ह्या नावाने एक निरंतर चालणारा उपक्रम घोषित केला आहे. सदर उपक्रमाला विद्यार्थी व विद्यार्थिंनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या फेरी अंती भुषण पोळ, प्रसाद खरे, वैभव सोनवणे,वैष्णवी श्रीनाथ,नुतन पाटिल,साक्षी मंडलिक,वैजयंती खुबचंदानी,दिपक अडकमोल आणि नीतीश पाटिल यांनी पहिल्या फेरीतील कोडिंग आणि प्रोग्रॅमिंग मधील आव्हान पूर्ण करत द्वितीय फेरीत प्रवेश केला. कोडिंग आणि प्रोग्रॅमिंग मधील अगदी सोप्या आणि मूलभूत ज्ञानाचे प्रगटीकरण करत संगणकाकडून वेगवेगळ्या गणन व विश्लेषण प्रक्रिया करवून घेत अत्यंत कठीण अश्या डेटा विश्लेषण प्रक्रियेतील तज्ञ् बनण्याचा प्रवास वेगवेगळ्या टप्प्यांच्या माध्यमातून ह्या उपक्रमाद्वारे करवून घेतला जाणार आहे.
प्राचार्य डॉ आर बी बारजिभे, समन्वयक डॉ. गिरीश कुलकर्णी , तांत्रिक समन्वयक प्रा. ए. पी. इंगळे यांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिंनींचे कौतुक करण्यात आले. प्रा. आर. पी. चौधरी यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.
धिरज बेहरानी, सायली ब-हाटे,पुजा यादव, अंशीका यादव,मानसी पाल,शहेजाद खान,आदित्य फालक,किरण पाटिल,विशाल पाचपांडे,धिरज पाटिल ह्या विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी परिश्रम घेतले.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसेन अग्रवाल,पंकज संड, यांनी ह्या उपक्रमाचे कौतूक केले.