भुसावळ – भगवान श्री परशुराम जयंतीनिमित्त उत्सव समितीतर्फे ,3 में रोजी सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिरापासून सुरुवात होऊन, म्युनिसिपल पार्कमधील श्रीराम मंदिरापर्यंत शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी महिलांनी लेझीमच्या कवायत सादर करुन शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.
ब। भगवान परशुराम जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सायंकाळी ५ वाजता अष्टभुजा देवी मंदिर ते राम मंदिर, म्युनिसिपल पार्क पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करुन महाआरती करण्यात आली.
समाजबांधवांनी परशुरामांचा जयघोष केल्याने संपुर्ण परिसर दणाणून निघाला. यावेळी अनेक समाजबांधवांनी पारंपारिक वेशभुषा परिधान केली होती. ढोल-ताशेच्या तालावर महिलांनी लेझीम खेळात ताल धरला होता लेझिम पथकाचा समावेश होता. अतिशय शिस्तबध्दरित्या लेझीमचे सादरीकरण केले.
शोभायात्रेच्या यशस्वितेसाठी पंडित रवीओम शर्मा, प्रशांत वैष्णव, जय प्रकाश शुक्ला, कैलास उपाध्याय, भूषण वैद्य, ए.के. तिवारी, सागर पत्की, देवेश कुलकर्णी, गौरव हिंगवे, गोकुळ दुबे, आशिष तिवारी आदींनी सहकार्य केले.

श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिति अध्यक्ष उमाकांत शर्मा ( नमा ) यांचे कुशल नेतृत्व व मार्गदर्शन यांवर समजबांधव यांनी विश्वास ठेवून अध्यक्षपदाची धुरा नमा शर्मा यांचे खांदयावर दीली असून गेल्या तिन वर्षापासून अत्यंत चोखपणे साभाळत आहे .
यंदा ३ में रोजी समिती अध्यक्ष उमाकांत शर्मा यांच्या नेतृत्वात ना भूतो ना भविष्यति अशी विराट शोभा यात्रा शहरात काढण्यात आली समाज बांधव,महिला शक्ति, युवा शक्ति, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व समस्त ब्राह्मण समाज या वेळी एकत्र आणण्याचे कार्य समिति अध्यक्ष उमाकांत शर्मा (नमा) यांनी केले व करून दाखवल्याने सर्व समाज बांधवानी शर्मा यांचे विशेष कौतुक केले आहे . दरम्यान आमदार संजय सावकारे यांच्या सुविद्य पत्नी सौ रजनी सावकारे यांनी महिला भगिनीसोबत लेझिम खेळात उत्स्फूर्तपणे सहभागी होवून लेझिम खेळण्याचा आनंद लूटला . सर्व महिलांनी उत्कृष्ट नियोजन व आयोजना बद्दल समिती अध्यक्ष नमा शर्मा यांचे विशेष कौतुक केले .
शोभायात्रेचे यश हे केवळ माझे नसून समितीसह सर्वांचे– नमा शर्मा
शोभायात्रेचे यश हे केवळ माझे एकटयाचे नसून यासाठी समितीच्या सर्वांचे सहकार्य व परिश्रम लाभले आहे
एकता व संघटन यामुळेच हे सर्व शक्य झाले भविष्यात सुद्धा तुम्हा सर्वांचे असेच प्रेम व सहकार्य राहो अशी परशुराम चरणी प्रार्थना करतो असे भावोद्गार समिती अध्यक्ष नमा शर्मा यांनी यावेळी व्यक्त केले .


