भुसावळ – सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकत्मता जोपासण्यासाठी तसेच देशात शांन्ती भाईचारासाठी रमजान ईदनिम्मीत ३ में रोजी शहर कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभागातर्फे “डॉ.बाबा साहेब आंबेडकर परिसर, रेल्वे स्टेशन बस स्टैन्ड छत्रपति शिवाजी महाराज स्मारक व ताजोद्दीन बाबा दरगाह जवळ उपस्थित सर्व नागरिकांना व गोर गरीब लोकांना जिल्हाध्यक्ष मो मुनव्वर खान, शहर अध्यक्ष सलीम गवळी यांनी सर्व हिन्दू मुस्लिम बाधवांना “शिरखुरमा” वाटप करण्यात आला .
या प्रसंगी शहर अध्यक्ष सलीम गवळी, शहर अध्यक्ष सेवा दल संजय खडसे, जिल्हा उपाध्यक्ष जे. बी. कोटेचा, महिला शहर उपाध्यक्षा हमीदा गवळी,शहर सचीव हमीद शेख सर,आदिवासी महिला शहर अध्यक्ष फातमा आपा, रमजान खाटीक,जानी गवली व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते



