भुसावळ येथे गरजु विद्यार्थ्यांनीना शैक्षणिक साहित्य वाटप :

भुसावळ – तालुक्यातील सिंधी येथे श्रीकृष्ण हायस्कूलमध्ये राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन वतिने महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव सोहळा कार्यक्रमात
राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन संचालित ” अवनी दत्तक योजना” शैक्षणिक उपक्रम अंतर्गत गोरगरिब, होतकरु,गरजु २० विद्यार्थ्यांनीना शैक्षणिक साहित्य वितरण तसेच पोक्सो कायदा बद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. अवनी दत्तक योजना ही तळागाळातील गरजवंत होतकरु विद्यार्थ्यांनी यांना शिक्षण घेण्यासाठी मदत व्हावी तसेच कोणीही शिक्षणा पासुन वंचित नसावे त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी हे आहे महामानवांच्या विचारांचा आदर्श ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच निता किरण जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका प्रतिमा पाटील, उपसरपंच तथा कृषी उत्पन्न समिती संचालक कैलास पाटील, ग्रा.पं. सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कांचन परदेशी, पोलीस पाटील अतुल पाटील, श्रीकृष्ण हायस्कूलचे संचालक भगवान पाटील, भगवान बडगुजर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भास्कर, प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश जावळे, वक्ते ॲड. रमेश पांडव उपस्थित होत. यावेळी ॲड. रमेश पांडव यांनी बाल लैगिंक अत्याचार विरोधी कायदा या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन अध्यक्ष राजेश्री सुरवाडे यांनी केले दरम्यान फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत असलेल्या बद्दल माहिती दिली तसेच फाउंडेशन च्या माध्यमातून नेहमी गरजवंताना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न करतो फाउंडेशन २०१४ पासुन सामाजिक उपक्रम राबवित असून अवनी दत्तक योजना शैक्षणिक उपक्रम २०२० मध्ये ३ एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे तसेच दरवर्षी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फाउंडेशन च्या वितीने अभिवादन कार्यक्रम राबविण्यात येतो व अभिवादन स्वरुपात शैक्षणिक साहित्य संकलन करण्यात येत असल्या बद्दल माहिती दिली, या पुढेही अशाच नियोजनाची शैक्षणिक साहित्य देऊन पुढेही जिल्ह्यात गरजवंत विद्यार्थ्यांनीना अवनी दत्तक योजना माध्यमातून मदत करणार आहोत.
अवनी दत्तक योजना शैक्षणिक उपक्रम अंतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेची बॅग, वह्या, कंपास, लेटरपॅड, पेन इतर साहित्य अवनी दत्तक योजना( शैक्षणिक उपक्रम) लाभार्थी विद्यार्थ्यांनींना देण्यात आले आहे. कार्यक्रमात श्रीकृष्ण हायस्कूलचे उपशिक्षक नारायण पाटील, शांताराम कोळी, राकेश ठाकरे, गोकुळसिंग राजपूत, निलेश फालक, राजेंद्र महाजन, महेश महाजन, रेखा नेमाडे, अर्चना उमराणे, कनिष्ठ लिपिक दिगंबर कोल्हे, लिपिक भगवान पाटील, आरोग्य सेविका आशा साळुंखे, आरोग्य सेवक बालाजी कोरडे, आशा सेविका लक्ष्मी कोल्हे, शालेय पोषण आहार मदतनीस लता पाटील, सुलोचना कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन गोकुळ सिंग राजपूत यांनी तर आभार शिक्षक समाधान जाधव यांनी केले. यशस्वीतेसाठी फाउंडेशन उपाध्यक्ष द्रोपदाबाई बाविस्कर, सचिव निर्मला सुरवाडे, सहसचिव शैला तायडे, सदस्य सुजाता सपकाळे यांनी परिश्रम घेतले.