बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये पंधरा दिवशीय समर कॅम्पला सुरुवात :


भुसावळ – येथील बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये पंधरा दिवशीय समर कॅम्पला (शिबीर) दि १ मे रोजी सुरुवात झाली. या समर कॅम्पचे उद्घाटन बियाणी एज्युकेशन ग्रुप चे अध्यक्ष मनोज बियाणी तसेच बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉक्टर संगीता मनोज बियाणी यांच्या हस्ते किट वाटप करुण झाले. यावेळी विनोद बियाणी,स्मिता बियाणी,रोनक बियाणी, प्रिन्सिपल डी एम पाटील सह शिक्षक वर्ग उपस्थित होते.
या शिबिरात इयत्ता ४ थी पासून तर इयत्ता १० वी पर्यंत विद्यार्थी व विद्यार्थिनी राहणार असून या सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय या शिबिरात करण्यात आलेली आहे.या शिबिरात अडीचशे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या शिबीरात विद्याथ्र्यांना इनडोअर व आऊटडोअर अॅक्टीव्हीटी शिकवली जाणार आहे. त्यात स्विमिंग,हॉर्स रायडींग,फुटबॉल, हॉलीबॉल,स्केटींग,बॉक्सिंग,कराटे, सिंगिंग,डान्सिंग,कॅरम,चेस, मेहंदी डिजाइन अशा वेगळ्या प्रकारच्या कलांचे प्रकार विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे. यासोबत विद्यार्थ्यांमध्ये स्टेज कॉम्पिटिशन घेतले जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्टेज डेअरींग व्हावी याच बरोबर मिलिट्री ट्रेनिंग च्या ज्या बेसिक ट्रेनिंग ॲक्टिविटी विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येणार आहे.यात ड्रील मार्क,रायफल शूटिंग,लेव्हल क्रॉसिंग,रोप वे या सर्व ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्याकडून करुण घेऊन तसेच त्यांना शिकवण्यात येणार आहे.जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले असल्याचे मिलिटरी स्कूलचे प्रिन्सिपल डी एम पाटील यांनी सांगितले आहे.