भुसावळ – शहरातील तहसील कार्यालयात १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे म्हणाले की,महाराष्ट्राच्या उभारणीत कामगारांचे मोठे योगदान आहे आज जो महाराष्ट्राचा व देशाचा विकास होत आहे तो कामगारांमुळे शक्य झालाआहे.
संयुक्त महाराष्ट्र स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक हुतात्मे झाले व महाराष्ट्र तयार झाला.यामध्ये मराठी भाषिक राज्य तयार झाले.स्वतंत्र्य राज्य तयार झाल्यानंतर देशातील एक प्रगत राष्ट्र म्हणून प्रगती केलेली आहे.इतर राज्यांपेक्षा केव्हाही पहिले तर महाराष्ट्र एक संस्कृती,अद्यावत,टेक्नॉलॉजी पुढे असलेला महाराष्ट्र ख्याती मिळवलेली आहे.सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात.
श्री.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज,असे मोठं मोठ्या विभूती जन्माला येऊन महाराष्ट्राचा गौरव वाढविला.व तसेच आमदार संजय सावकारे यांनी १ मे कामगार दिनाच्या सर्व कामगार बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या.



