मनोरंजनाच्या दुनियेत’मल्टीप्लेक्सप्ले या नवीन ओ.टी.टी. चॅनलचे दिमाखदार आगमन :


अंधेरी – येथील एन.के.एफ. सी. प्रा.लि. च्याअंतर्गत सुरु होणा-या मल्टीप्लेक्सप्ले या
नवीन ओ.टी. टी. चॅनलचे दिमाखदार उदघाटन झाले. मराठी, इंग्रजी, हिंदी, भोजपूरीसहित इतर 15 भाषातील
कार्यक्रमांचे या चॅनलवर प्रसारन सुरु करणार असल्याची माहिती कंपनीचे सी.एम.डी. श्री. रेहान अली यांनी दिली.
तसेच या चॅनलच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी प्रोग्रामिंग हेड म्हणून निर्माता-दिग्दर्शक अविनाश जाधव,
दिपांकर अधिकारी व उदय मोहिते यांची नियुक्ती केली. बॉलीवूडच्या सक्षम व जानकार अधिका-यांच्या
नियुक्तीमुळे चॅनलचा कारभारपारदर्शी, गुणवत्तापूर्ण होईल असे मत दिग्दर्शक आमोल व्दिवेदी यांनी मांडले.
या चॅनलवर मालिका व चित्रपटांची निवड प्रक्रिया अतिशय सोपी असून निर्मात्यांनी कोणत्याही दलालांची मदत
न घेता थेट कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन कंपनीचे प्रोग्रामिंगहेड अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी
बोलताना केले. निवड प्रकिया सोपी असल्याने या चॅनलवरील कार्यक्रमांमध्ये नवोदित कलाकार, लेखक व
दिग्दर्शकांनाही संधी मिळेल अशी माहिती चित्रपट निर्माता एस पी मिलिंद यांनी दिली.
सदर कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध संगीतका दिलिप सेन, वेस्टर्न इंडियाचे दिलिप दळवी अभिनेत्री नयन
पवार, सुनिता कांबळे, चित्रपट निर्माता एस पी मिलिंद, सामाजिक कार्यकर्ते प्रतिक यादव अधिवक्ता अजय पोळ,
यांची उपस्थिती उल्लेखनिय होती. सर्वपाहुण्यांचे स्वागत क्रिएटिव्ह डिरेक्टर महादेव साळोखे यांनी केले.