भुसावळ – महिलांच्या सशक्त व सकारात्मक बदलासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असून
स्त्री शक्तीचा मानसन्मान केलाच पाहिजे ,महिलांच्या भावनांचा आदर सर्वानी करावा महिला सशक्तीकरणावर शासनाने सुद्धा अधिक भर देवून त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून गौरव करीत असल्याचे मत येथील अप्पर रेल्वे प्रबंधक रुकमैय्या मीणा यांनी व्यक्त केले .
शहरातील महिला शक्ति समाज सेवा महिला मंडळ संस्थापक अध्यक्षा अंजुम खान यांचेसह महिला मंडळ सदस्यांनी कार्यकुशल नेतृत्व तथा जिद्द व मेहनतीने परिस्थितीवर मात करून राजस्थान ,नाशिक , प्रयागराज सह भुसावळ येथे आपल्या प्रामाणिकपणा व मेहनतीच्या बळावर अल्पावधीत उल्लेखनीय कार्य करून नावलौकिक मिळवणारे भुसावळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात कार्यरत अधिकारी एडीआरएम रुकमैय्या मीणा यांची विशेष भेट घेवून त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला .
यावेळी शाल ,श्रीफळ , व पुष्पगुच्छ भेट देवून सन्मानित करण्यात आले .
भेटी दरम्यान रुकमैय्या मीणा यांनी त्यांच्या कष्टमय जीवन प्रवासातील अनुभव थोडक्यात सांगीतले .
यात शालेय जीवनापासुन ते उच्चपदस्थ पदावर नियुक्ति कशी झाली याबाबत सविस्तर माहिती दिली. नोकरी कार्यकाळात प्रयागराज , येथे आयोजित कुंभ मेळाव्यात सुद्धा भाविकाच्या राहण्याची निःशुल्क सेवा व सोय स्वतः रुकमैय्या मीणा यांनी केली गरजु व गरीबांचे काम करतांना मिळणारे समाधान फार मोठा आनंद देतात असेही ते यावेळी म्हणाले . तसेच आयुष्यात सुख व समाधानासाठी विचार बदला ..असे सांगत प्रत्येक व्यक्तित नेहमी सकारात्मक योग्य विचार असलेच पाहिजे , चांगले विचार हिच यशाची गुरुकिल्ली असते असे मतही मीना यांनी व्यक्त केले .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा आदर असून प्रत्येक घराघरात संविधान असेल व त्यांचे विचार असतील तर आपण नक्कीच खडतर परिस्थितीवर मात करु शकतो यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचे असून शिक्षणाचे महत्व विषद केले .
यावेळी महिला दक्षता समुपदेशक भारती म्हस्के ,पत्रकार उज्वला बागुल , निरंजना तायडे , अँड प्रिया अडकमोल ,यांचेसह श्रीमती छाया , तस्लीमा तडवी , लॉ विद्यार्थिनी प्रतिमा अग्रवाल आदीं उपस्थित होते .



