भुसावळ : शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढून त्याजागी नवीन कॅमेरे लावण्यासाठी जिल्हा नियाेजन समिती २० लाख रूपये देणार आहे. त्यामुळे अामदार संजय सावकारे मित्र मंडळाकडून पैसा जमवून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार हाेते. ताे निधी अन्य सामाजिक कामासाठी खर्च केला जाणार आहे, असे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या तीन वर्षापासून बंद आहेत. दुसरीकडे गुन्हेगारी वाढली आहे. ही वाढती गुन्हेगारी राेखण्यासाठी शहरातील प्रमुख भागात सीसीटीव्ही कॅमेरे असणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार संजय सावकारे यांच्या मित्र परिवाराने निधी जमा केला. त्यातून पाेलिस ठरवतील त्या ठिकाणी कॅमेरे लावले जाणार होते. प्रायाेगिक तत्वावर दाेन ते तीन ठिकाणी सीसीटीव्ही लावले होते. मात्र आता जिल्हा नियाेजन समितीकडून शहरातील कॅमेऱ्यांसाठी २० लाख रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्या निधीतून आता सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.


