भुसावळात श्री भगवान परशुराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरु : अध्यक्षपदी उमाकांत शर्मा, उपाध्यक्ष आशिष तिवारी,सचिव दीपक पाथरकर यांची निवड : तीन दिवशीय विविध कार्यक्रमांचे आयोजन : भव्य शोभायात्रेचे आयोजन :

: भुसावळ – भुसावळात ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत श्री भगवान परशुराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून दिनांक १ ते ३ मे दरम्यान तीन दिवशीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . यानिमित्त
श्री बड़ा हनुमान मंदिर येथे सर्वानुमते बैठक घेण्यात आली .2020- 2021 कोरोनाच्या संकटामुळे शोभायात्रा न काढता सामाजिक उपक्रमाद्वारा साज़री करण्यात आली होती. यंदा या उत्सवानिमित्त सर्वानुमते तीच कार्यकारिणी या वर्षी कायम ठेवण्यात आली.
यात अध्यक्ष पदी उमाकांत शर्मा (नमा) यांची तर उपाध्यक्ष आशिष तिवारी,सचिव दीपक पाथरकर ,खजिनदार देवेश कुळकर्णी यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी कैलास उपाध्याय, पंडित रविओंम शर्मा, जयप्रकाश शुक्ला, प्रशांत वैष्णव, रमाशंकर दुबे, विनोद शर्मा, भगवान शर्मा, भुषण वैद्य, आनंद जोशी, आशुतोष दलाल, सागर पतकी, वेद ओझा,ऐड. अभिजीत मेने, केऱ्हाळकर गुरुजी, खुशाल जोशी, रूपेश तायड़े,प्रशांत उपासनी, गणेश साकी, ऐ के तिवारी, गौरव हिंगवे, चेतन शर्मा, आदित्य शर्मा, अभिलाष नागला, मयूर तिवारी, अँड संजय तिवारी, गोपाल जोशी, दिनेश जोशी,आदि ब्राह्मण समाज बांधव उपस्थित होते.
या निमित्त 1/05/2022 रोजी राम मंदिर सराफ बाज़ार येथे संध्याकाळी ठीक 6 वाजता नारायण ओझा (जळगावकर) यांचा भजन संध्या कार्यक्रम. 02/05/2022 रोज़ी संध्याकाळी ५ वाजता श्री साईंबाबा मंदिर ते परशुराम मंदिर तापी नदी या मार्गे मोटरसाइकिल रॅली निघणार आहे . तर दिनांक 3 रोज़ी संध्याकाळी ठीक 5 वाजता श्री अष्टभुजा माता मंदिरा पासून
भव्य शोभायात्रा श्री राम मंदिर मार्गे म्युनिसिपल पार्क पर्यंत निघणार असून या शोभायात्रेचा समारोप श्री राम मंदिर म्युनिसिपल पार्क येथे होईल. या ठिकाणी महाप्रसाद(भोजन)ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी सर्व समाज ब्राह्मण बंधूंनी सहकुटंब,सहपरिवार उपस्थित राहुन सहकार्य करावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन समिती व समस्त ब्राह्मण सामाजाच्या वतीने करण्यात येत आहे.