भुसावळ : श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त उत्सव 22 ते 28 एप्रिल दरम्यान मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला.
श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) नंदनवन कॉलनीत येथे हा उत्सव झाला. उत्सवाची सांगता सत्य दत्त पूजन, महा आरती, महा नैवेद्य करून झाली.
या सप्ताह काळात शहर व ग्रामीण भागातील शेकडो सेवेकरी काका मावशी व ताई, भाऊ सेवेकरी यांनी विविध सेवा श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त ऑनलाईन व प्रत्यक्षपणे सेवा रुजू केल्या.त्यात प्रामुख्याने अखंडपणे सप्ताह कालावधीत विविध सेवा रुजू केल्या.

अखंड प्रहर सेवा, श्री गुरुचरित्र पारायण- केंद्रात ५२ पारायण, ऑनलाईन स्वरुपात घरी गुरुचरित्र पारायण १५० पाठ,
श्री स्वामी समर्थ मंत्र जप १९ लाख ४९ हजार , १०७ करण्यात आले.
नवार्णव मंत्र जप – ८८ हजार ६६५, गायत्री मंत्र जप १८ हजार ५७६, महामृत्युंजय मंत्र जप १४ हजार ६५, श्री स्वामी चरित्र सारामृत – १४७ पाठ, श्री दुर्गा सप्तशती पारायण २५५ पाठ. अशा सेवा झाल्या.
अशा प्रकारच्या विविध सेवा अखंडपणे करण्यात आली या सप्ताहात भाविक भक्तांनी भावपूर्ण व श्रद्धेने भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नाम जप यज्ञाचा जयघोष केला व कार्यक्रमाची सांगता झाली.


