नाहाटा महाविद्यालयात वाहतुकीचे नियम व रोड सेफ्टी कार्यशाळा संपन्न

भुसावळ ( प्रतिनिधी ) – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे गुरुवार २८ रोजी महाविद्यालयातील शिस्त समिती व वेल्सपन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाहतुकीचे नियम व रोड सेफ्टी’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

कार्यक्रमाचे उद्घाटक सोमनाथ वाकचौरे (डी.वाय.एस.पी, भुसावळ) हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील हे होते. विचारमंचावर प्रमुख पाहुणे राहुल गायकवाड (पी.आय. बाजार पेठ पोलिस स्टेशन), .राजेंद्र सोनवणे (पी.एस.आय.), नाम्रपाली गोंडाणे, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. डी. गोस्वामी, उपप्राचार्य प्रा. डॉ.एन. इ. भंगाळे, उपप्राचार्य प्रा.उत्तम सुरवाडे तसेच इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची रूपरेषा शिस्त समिती प्रमुख प्रा. डॉ. अनिल हिवाळे यांनी मांडली.

कार्यशाळेचे उद्घाटक सोमनाथ वाकचौरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, भारत हा सर्वात जास्त अपघात होणारा देश आहे. एका दिवसात भारतात अपघातामध्ये 414 लोक मृत्युमुखी पडतात, तर एका तासात 17 लोक मृत्युमुखी पडतात. भारतातील अपघात मृत्यूचे प्रमाण त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले की, “रस्ता चांगला असून चालत नाही रस्त्याचे नियम माहीत असले पाहिजे, रस्त्याचे नियम माहीत नसल्यास रस्ते मृत्यूचा सापळा बनतात.” रस्त्यावरील चुकीला माफी नाही. त्यामुळे जबाबदारीने वाहतुकीचे नियम पाळणे, जीवितासाठी आवश्यक आहे.

तर पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी वाहतूक कायदा स्पष्ट करून तरूणांमध्ये कायद्याबाबत उदासीनता असल्याचे सांगितले. वाहतूक नियमाप्रमाणे नंबर प्लेट नसणे, हेल्मेट न घालने, लायसन्स नसणे अशा महत्त्वाच्या गुन्ह्यांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना जागृत केले.

उद्घाटन सत्राचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. वाहतूक नियम पाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोस्टर बनवण्याबरोबरच त्यातील विचार अंगिकारणे महत्त्वाचे आहे असे त्यानी नमूद केले.

द्वितीय सत्रात नाहाटा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या राजेंद्र सोनवणे (पी.एस.आय) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची जाणीव करून देऊन, पोलिसांचा आदर करा असा संदेश दिला. कायदा व सुव्यवस्थेसाठी हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिस्त समाजाच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वाची असते. दारू पिऊन गाडी चालवू नये असाही संदेश त्यांनी दिला. तसेच सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरं द्वारे मार्गदर्शन केले. संतोष वंजारी यांनी राष्ट्रीय महामार्गावरील विविध रस्त्याच्या सांकेतिक चिन्ह व घ्यावयाची सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रामध्ये वाहतूक नियम व रोड सेफ्टी या विषयावरील पोस्टर प्रदर्शन संपन्न झाले. या पोस्टर प्रदर्शनांमधून महाविद्यालयातील विविध 62 पोस्टर विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यातून प्रथम पारितोषिक गायत्री बजाज, द्वितीय रितिक इंगळे, तृतीय सारंग नकवाल व दोन उत्तेजनार्थ बक्षीस ईश्वरी लढे व मेघा इंगळे या विद्यार्थ्यांना मिळाले.

शेवटच्या सत्रात समारोप कार्यक्रम व बक्षीस वितरण संपन्न झाले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. डी. गोस्वामी होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. ए. सोळुंके यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.डॉ अनिल हिवाळे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिस्त समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले. त्यात प्रा. अजय तायडे, प्रा. जे. पी. पाटिल, प्रा. प्रियांका मिस्त्री, प्रा. भाग्यश्री भोळे, डॉ. पि. के.पाटील, डॉ. आर. एस.नाडेकर, डॉ. डी. एम.टेकाडे, प्रा. डी. एन. पाटील, डॉ. स्मिता चौधरी, डॉ. आनंद उपाध्याय, प्रा. संगीता भिरूड, डॉ.गौरी पाटील, . भगवान तायडे, यांनी अनमोल सहकार्य केले. तसेच वेल्सपण फाऊंडेशनचे नाम्रपली गोंडाणे, शोयब शेख, रुपेश गायकवाड हे उपस्थित होते.