आंतरपीक घेत टरबूजाचे घेतले विक्रमी उत्पादन : न्हावी येथील युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग :


जळगाव – जिल्ह्यातील यावल,रावेर आणि इतर तालुक्यात केळी पिकाला पर्याय म्हणून कोणी अद्रक तर कोणी हळदीचे उत्पादन घेत असल्याचे दृश्य दिसून येत आहे.
टरबूज या हंगामी पिकाचे न्हावी येथील युवा शेतकरी सचिन इंगळे हे अत्यंत विक्रमी उत्पादन घेत असून एकरी सुमारे 29 ते 30 टन असे विक्रमी उत्पादन घेत आहेत. न्हावी येथील युवा शेतकरी सचिन इंगळे यांना यांना काहीसा दिलासा मिळाला असून चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून येत आहे.
योग्य नियोजन ,तंत्रशुद्ध आणि अभ्यासपूर्ण शेती करत सचिन इंगळे यांनी 45 दिवसात प्रेरणादायी ठरेल असे टरबूजाचे उत्पादन घेतले आहे.
टरबूजाचे एक फळ जवळपास 8 ते 9 किलो वजन देत आहे असे श्री.इंगळे यांनी बोलताना सांगितले.
प्रत्येक शेतकऱ्याने एकाच पिकाच्या मागे न लागता वेगवेगळे प्रयोग करून आंतरपिके घेतली पाहिजे.शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास यामुळे मदत होते असेही ते म्हणाले.टरबुजाच्या शेतीत त्यांनी केळी हे आंतरपीक घेतले आहे.पाच एकरमध्ये टरबुजाचे संकरित वाण लावले असून फळांची काढणी सुरू आहे.फक्त पन्नास ते पंचावन्न दिवसात टरबुजाचे भरघोस उत्पन्न येत असते. एकरी साधारणतः अडीच ते तीन लाखाचा नफा होत असतो असेही इंगळे म्हणाले.
इंगळे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर तज्ञ व्यक्तींना बोलावून मार्गदर्शनाचा लाभ दिला , योग्य आणि अचूक मार्गदर्शन तसेच पाणी व्यवस्थापन, खते आणि कीड रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात आले. शेकडो शेतकऱ्यांनी सचिन इंगळे यांचे कौतुक केले आहे.
याप्रसंगी कलश सिडस प्रायव्हेट लिमिटेड जालनाचे किरण निकम ,अधिकारी राहुल पवार ,संजय भोई , जेष्ठ प्रगतिशील शेतकरी व केळी उत्पादक टेनू डोंगर बोरोले , लक्ष्मण ओंकार चौधरी , चंद्रशेखर पाटील यांची उपस्थिती होती.