हनुमान उत्सव निमित्त एस एस बी टी कॅम्पस येथे वसतिगृहाच्या विदयार्थ्यांनी केले संगीतमय सुंदरकांडचे आयोजन :

जळगाव – श्रम साधना ट्रस्ट संचलीत अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी, जळगाव येथील मुलींचे व मुलांचे वसतिगृह विभागाच्या वतीने हनुमान उत्सव निमित्त संगीतमय सुंदरकांडचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने 2 वर्षानंतर पुन्हा एकदा कॉलेजचा परिसर दुमदुमला.
या प्रसंगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. के. पटनाईक , विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एल. पाटील, डॉ. एस.पी.शेखावत, श्री.बी.सी.कछावा, सौ. पुष्पा रावल, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठाप्रमाणात उपस्थित होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या परिसरातील श्रीगणेश मंदिरात भक्ती भावाने साजरा करण्यात आला.
35 वर्षापासून विद्यार्थ्यांना सुविधा देणारे व त्यांना घडविणारे अस हे हॉस्टेल अचानक लॉकडाउनमुळे बंद झाले याची खंत सगळ्यांनाच वाटत होती. लॉकडाउन लागल्यावर ते बदलेल आयुष्य व नंतर हॉस्टेल सुरु झाल्यानंतरचा आनंद वेगळाच होता. इथे वेगवेळे उपक्रम राबवले जातात.
वसतिगृहात वेगवेगळे सण व उत्सव नेहमी साजरे केले जातात. यामध्ये प्रामुख्याने गणेश उत्सव , होळी पूजन,रंगपंचमी , रामनवमी ,नवरात्री ,गोकुळाष्टमी, सरस्वती पूजन , शिवजयंती , डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती ,कोजागिरी पौर्णिमा , हनुमान जयंती चा समावेश आहे. परंतु याचबरोबर नियमांचे व स्वच्छतेचे काटेकोर पालन केले जाते . सोबतीला पौष्टिक व सात्विक असा आहार असतो .