यावल- तालुक्यातील फैजपूर येथे संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्यावतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढुन प्रेताचे फैजपूर प्रांत कार्यालया समोर दहन करण्यात आले ,

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लिमांच्या मज्जित वरील भोंगे काढण्याचा विषय लावून धरला आहे, त्यामुळे हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होऊन जातीय दंगली घडविण्याचा प्रकार चालविला आहे ,त्या निमित्ताने संविधान आर्मी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे आणि विविध दहा संघटनेचे पदाधिकारी यांच्यावतीने सोमवार रोजी फैजपूर येथील सुभाष चौक येथून प्रांताधिकारी कार्यालयात पर्यंत राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे प्रेतयात्रा काढण्यात आली ,व प्रांताधिकारी कार्यालयासमोर राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले राज ठाकरे यांना (रासुका) राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत अटक करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली,
अन्यथा 1 मे ला मुंबई येथे रेल रोको करणार असा कडक इशाराही संविधान आर्मी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांनी दिला आहे


