भुसावळ – रेल्वेने प्रवाशांची उत्तम सुरक्षितता आणि आरामदायी प्रवासासाठी ट्रेन क्रमांक 15645/15646 लोकमान्य टिळक टर्मिनस – गुवाहाटी – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेसचा पहिला रेक एलएचबी डब्यांसह बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

एलएचबी कोचच्या पहिल्या रेकची सुधारित संरचना असलेली ट्रेन आता प्रत्येक शनिवारी दिनांक 02.4.2022 पासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून आणि गुवाहाटी येथून दर बुधवारी धावेल.
सुधारित संरचना: एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, पाच वातानुकुलीत तृतीय श्रेणी, 11 स्लीपर क्लास आणि 3 सामान्य द्वितीय श्रेणी, एक पँट्री कार आणि एक जनरेटर व्हॅन.


