ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळद्वारे निर्मित पिनाका लाँचर पॉड एमके-1ची यशस्वी चाचणी :

भुसावळ : पिनाका रॉकेट लाँचर पॉड MK – 1 बनवण्याचे काम 2014 पासून यशस्वीपणे केले जात आहे. यासोबतच आयुध निर्माणी भुसावळमध्ये नवीन प्रकारचे पिनाका रॉकेट पॉड DPICM, व ENHANCED आणि GUIDED विकसित करण्याचे कामही यशस्वीपणे सुरू आहे.

अलीकडे, 29 मार्च रोजी, ऑर्डिनेंस फैक्ट्री भुसावळने निर्मित पिनाका पॉड MK-1 ची पोखरण येथे उन्नत पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली. ENHANCED पिनाका रॉकेटची रेंज 45 किमी आहे. तर पिनाका रॉकेट MK-1 ची क्षमता 38 किमी आहे, ज्याचे पॉड सध्या ऑर्डिनेंस फॅक्टरी भुसावळद्वारे तयार केले जात आहे. आयुध निर्माणी भुसावळसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. या यशस्वी चाचणीबद्दल आयुध निर्माणी भुसावळचे महाव्यवस्थापक वसंत निमजे यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

ऑर्डिनेंस फैक्ट्री भुसावळ मध्ये गेल्या 6 महिन्यांतील हे दुसरे यश आहे. डिसेंबर 2021 मध्ये पोखरणमध्ये DPICM पॉडची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

‘पॉड’ हा रॉकेट प्रक्षेपण यंत्रणेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या ‘पॉड’ मधून रॉकेट लाँच आणि डागले जाते. रॉकेटचे उद्दिष्ट आणि दिशा “पॉड” वर अवलंबून असते. विविध प्रकारच्या चाचण्या पार केल्यानंतरच हे ‘पॉड’ रॉकेट लोड करण्यासाठी पाठवले जाते.

ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ GUIDED (मार्गदर्शित) पिनाका लाँचर पॉड विकसित करण्यावरही काम करत आहे. गाइडेड पिनाका रॉकेटची रेंज 75 किमी आहे.
अशी माहिती ऑर्डनन्स फॅक्टरीचे जनसंपर्क अधिकारी
बी . देवीचंद (डी जी एम) यांनी दिली आहे.