भुसावळात लेडीज रनमध्ये 427 महिलांनी नोंदविला यशस्वी सहभाग :


भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित लेडीज इक्वलिटी रन रविवार 27 मार्च रोजी संपन्न झाला. यामध्ये 3 किमी, 5 किमी व 10 किमी या वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 427 महिला धावपटूतर्फे यशस्वी सहभाग नोंदविण्यात आला. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, डॉ उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ अनघा पाटील, साईजीवन सुपर शॉपीच्या संचालिका सौ कविता कोठारी, भेल इंडिया लिमिटेडचे श्री जावडे साहेब, हॉटेल मल्हारच्या संचालिका सौ कीर्ती धनगर, न्यूट्रीमॅक्सच्या सुप्रिया पाटील, एफएम तडकाच्या जागृती भावसार, प्रमुख पाहुण्या डॉ. सोनाली महाजन, स्पर्धेच्या सदिच्छादूत प्रेमलता सिंग,
सौ ओवी वाकचौरे, सौ मृदुला चिद्रवार, संयोजिका डॉ नीलिमा नेहते, डॉ. चारुलता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेची सुरुवात व सांगता रेल्वे क्रीडांगणावर झाली.
10 किमी सुरुवात सकाळी ठीक 6.00 वाजता, 5 किमी 6.30 वाजता तर 3 किमी 7.00 वाजता अगदी वेळेवर करण्यात आली या रनचे वैशिष्ट्य होय. प्रत्येक रनचे आधी एपीएस झुम्बा फिटनेसच्या पारुल वर्मा व त्यांच्या टीमतर्फे झुंबा व्यायाम प्रकाराद्वारे स्पर्धकांचा वॉर्मआप घेण्यात आला. प्रत्येक महिला स्पर्धकास रन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पदक प्रदान करण्यात आले.
रन दरम्यान भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सदस्य ठीकठिकाणी स्वयंसेवकाच्या भूमिकेतून महिला स्पर्धकांचा उत्साह वाढवीत होते. शिवाय ठीकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रस्त्यावर कुठेही प्लास्टिक कचरा टाकू नये यासाठी भुसावळ रनरचे सदस्य विशेष काळजी घेत होते. शिवाय बाजारपेठ पोलीस स्टेशन व वाल्मीक चौक या ठिकाणी महिला धावपटूवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विशेष विजयी भावना महिला धावपटूंमध्ये दिसत होती. याशिवाय राधाकृष्ण प्रभात फेरी ,ज्येष्ठ नागरिक संघ, सिंधी कॉलनी येथील जय झुलेलाल ग्रुप, सूर्यकन्या तापी ग्रुप, महाराष्ट्र पोलीस दल व शहर वाहतूक शाखेतर्फे ठीकठिकाणी वाहतूक व्यवस्थापनाचे व धावपटूंचा रन अधिक सुरक्षित असावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आला. स्पर्धा समाप्त झाल्यानंतर भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांद्वारे रनच्या मार्गावर व रेल्वे क्रीडांगणावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व स्वच्छ शहर सुंदर शहर प्रदूषण मुक्त शहर असा संदेश आपल्या कृतीद्वारे देण्यात आला.
रन पूर्ण झाल्यानंतर सर्व महिला धावपटूंनी नाश्त्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात महिला धावपटूतर्फे आयोजित रनबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. शिवाय ठीकठिकाणी सेल्फी पॉइंट असल्यामुळे सेल्फीचा आनंद घेण्यात आला. लकी ड्रॉ द्वारे मान्यवरांच्या हस्ते 7 महिला धावपटूंचा सत्कार करण्यात आला व त्यांना आकर्षक भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ चारुलता पाटील, सूत्रसंचालन सायली पाटील व प्रवीण पाटील तर आभार प्रदर्शन डॉ नीलिमा नेहते यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी काव्या नगरनाईक, सिद्धी कुलकर्णी ,आरोही कुलकर्णी, यज्ञा पाटील, मिताली लोखंडे, स्वाती फालक, शितल चोरडिया, पुनम कुलकर्णी, पूजा बलके, संजीवनी लाहोटी, हर्षा लोखंडे, तृप्ती नगरनाईक, प्रिया पाटील, निधी अग्रवाल ,ममता ठाकूर , सरोज शुक्ला ,सुवर्णा पाटील ,सोनाली वारके, कांचन पाटील ,सोनाली पाटील, मीना नेरकर, ज्योत्स्ना पाटील , कंगना मनवानी, कृपा मुलचंदानी, सीमा पाटील या महिला सदस्यांसह भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले.